“भारत मातेच्या जयघोषात गडचिरोली येथे महायुतीची भव्य दिव्य तिरंगा बाईक रॅली”
1 min read“गडचिरोली शहरात देशभक्ती च्या वातावरणात मोठ्या उत्साहाने स्वातंत्र्य महोत्सव साजरा”
घरो घरी तिरंगा, हर घर तिरंगा या अंतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने गडचिरोलीत महायुतीची भव्य तिरंगा बाईक रॅली…
गडचिरोली, ऑगस्ट १५ : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व स्वतंत्र्य दिनाच्या निमित्ताने हर घर तिरंगा, घरोघरी तिरंगा याा निमित्ताने फटाक्यांच्या आतिषबाजीने डीजेच्या तालात देशभक्तीपर गीत गात, वंदे मातरम् व भारत माता कि जय अशा जयघोषात महायुतीची तिरंगा रॅली इंदिरा गांधी चौकातुन तिरंगा ध्वज हातात घेऊन बाईक रॅली उत्स्फूर्तिने देशभक्ती प्रेरित करत निघाली.
या तिरंगा रॅलीत माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक नेते यांच्यासह जिल्हाध्यक्ष प्रशांत जी वाघरे,माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, राष्ट्रवादी काँग्रेस चे रविंद्र वासेकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हेमंतजी जंब्बेवार,जिल्हा उपाध्यक्ष तथा आदिवासी मोर्चा चे प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ.मिलिंदजी नरोटे, जिल्हा महामंत्री गोविंद जी सारडा, किसान मोर्चा चे प्रदेश सचिव रमेश जी भुरसे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्रजी ओल्लालवार,प्रदेश चिटणीस रेखाताई डोळस, जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे,युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा गिताताई हिंगे,युवा मोर्चा राष्ट्रवादी कॉग्रेस चे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, यांच्यासह शेकडों कार्यकर्ते बंधू भगिनीं उपस्थित होते.