“शिर्डी येथे होणाऱ्या पत्रकारांच्या राज्यस्तरीय शिखर अधिवेशनात मोठ्या संख्येने शामिल होण्याचे जिल्हाकार्याध्यक्ष नसीर हाशमी यांचे आव्हान”
1 min readगडचिरोली, ऑगस्ट १७: येत्या ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर,२०२४ रोजी शिर्डी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शिखर अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या अधिवेशनात जिल्ह्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आव्हान व्हॉईस ऑफ मीडिया जिल्हाकार्याध्यक्ष नसीर हाश्मी यांनी केले आहे.
सदर अधिवेशनात सहभागी होवू इच्छिणाऱ्या पत्रकारांनी २० ऑगस्ट पूर्वी तालुका अध्यक्ष यांचेकडे नाव नोंदणी कारणे आवश्यक आहे. नोंदणी झालेले सहभागी इच्छुक पत्रकारांचे नाव जिल्हा अध्यक्षांनी संबंधित विभाग प्रमुखांकडे पोहोचते करणे आवश्यक आहे. आपापल्या जिल्ह्यातून किती सदस्य शिर्डी अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत त्याचा निश्चित आकडा उपलब्ध झाल्यास शिर्डी येथे निवास व भोजनाची सुविधा करणे सोपे जाईल.
30 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजे नंतर किती लोक शिर्डी येथे मुक्कामाला येणार आहात, त्याचाही तपशील मुदतीत द्यावा.
तसेच दिनांक एक सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजेला आपला संपूर्ण कार्यक्रम समाप्त होणार आहे. कार्यक्रम तीन वाजता पूर्ण होईल तीन ते पाच आपल्याला स्वतंत्रपणे साईबाबांचे दर्शन होणार आहे.
त्यामुळे एक सप्टेंबर रोजी कोणाचीही निवास व्यवस्था करण्यात आलेली नाही, अपवादात्मक परिस्थितीत काहींचे आरक्षण वगैरे प्रॉब्लेम असतील अशा १०० /२०० लोकांची व्यवस्था करता येईल परंतु याबाबत पूर्व सूचना देणे अत्यंत आवश्यक आहे. ऐन वेळेला सांगितल्यावर व्यवस्था होणार नाही याची कृपया सर्व पत्रकारांनी दक्षता घ्यावी.
गडचिरोली ज्या ज्या तालुक्याची यादी अजून जिल्हा अध्यक्ष यांचे कडे पोहोचलेली नाही त्यांनी कृपया जिल्हा संघटक चेतन गहाणे यांचेशी संपर्क साधून यादी उपलब्ध करुन द्यावी.
राज्यातून अनेक जिल्हाध्यक्षांकडून राज्यस्तरीय शिखर अधिवेशनासाठी सहकुटुंब यावे अशी वारंवार मागणी होत आहे. सहकुटुंब येणाऱ्यांची संख्या २२५ ते ४१५ पर्यंत जात आहे. श्री साईबाबांचे दर्शन होईल याबाबत दुमत नाही, परंतु भोजन अल्पोपार व निवास व्यवस्था अडचणीची होऊ नये असे वाटते. तरीदेखील, आपले राष्ट्रीय अध्यक्ष श्री संदीप काळे सर यांनी मला आज असे निर्देश दिले आहेत की,
किमान १०० सहकुटुंब आलेल्या पत्रकारांचे आपण निवास भोजन व्यवस्था करू शकतो अशा प्रकारचे नियोजन आपण करूया. तरी जिल्ह्यातील सहकुटुंब शिर्डी अधिवेशनात सहभागी होवू इच्छिणाऱ्या पत्रकारांनी तशी नोंद जिल्हाअध्यक्ष यांच्या कडे द्यावी.