December 22, 2024

पूराडा आविका संस्थेवर पोरेड्डीवार गटाचा झेंडा, सभापती गावराणे , उपसभापती पदावर डोगंरवार अविरोध

1 min read

कूरखेडा, ऑगस्ट २१: आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था पूराडा येथील संचालक मंडळामधून घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणूकीत पोरेड्डीवार सावकार गटाचे डोमनदास गावराणे यांची सभापती तर हरिश्चंद्र पाटील डोंगरवार यांची उपसभापति पदावर अविरोध निवड प्रक्रिया आज पार पडली.
पूराडा आविका संस्थेचा संचालक मंडळाची निवडणूक यापूर्वीच अविरोध संपन्न होत जिल्हा नागरी बैंकेचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार आमदार कृष्णा गजबे,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेचे संचालक खेमनाथ पाटील डोंगरवार यांचा नेतृत्वात संचालक पदावर डोमनदास गावराणे, रामलाल हलामी,सदाराम होळी, कृष्णा मानकर,विजय पूराम, लखनलाल करपते,देवराम गव्हाणे, हरिश्चंद्र डोगंरवार,पंढरी मांडवे, रामचंद्र रोकडे, रामचंद्र कोडापे,ललीता नरोटे व सईबाई कूमरे यांची अविरोध निवड संपन्न झाली होती आज संचालक मंडळामधून सभापती उपसभापति पदाची निवड प्रक्रिया सूद्धा अविरोध संपन्न झाली. निवडणूकीची जवाबदारी सहकार अधिकारी श्रेणी १ सूशिल वानखेडे यानी पार पाडली तर संस्थेचे व्यवस्थापक हिराजी मेश्राम यानी सहकार्य केले. निवडणूक परिणामाची घोषणा होताच सहकार नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांचा मार्गदर्शनात जिमस बैंकेचे संचालक खेमनाथ पाटील डोंगरवार भाजपा अनुसूचित जाति सेलचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अॅड उमेश वालदे व सहकार गटाचा कार्यकर्तानी गूलाल उधळत जल्लोष साजरा केला.

About The Author

error: Content is protected !!