देशी-विदेशी दारूसह ९ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त; अहेरी पोलिसांची धडक कारवाई
1 min readगडचिरोली , सप्टेंबर ०३ : अहेरी पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांच्या घरी धाड टाकून देशी-विदेशी दारूसह ९ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. यात तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. देवाजी निला सिडाम (वय 34), दिलीप रामा पोरतेट (वय 28), संपत पोच्चा आईलवार (वय 38), सर्व रा. कोलपल्ली ता. अहेरी अशी आरोपींची नावे आहेत.
02 सप्टेंबर रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे अहेरी येथील प्रभारी अधिकारी पोनि. स्वप्नील ईज्जपवार हे पोस्टेच्या स्टाफसह हद्दीतील अवैध धंद्यांवर आळा घालण्याकरीता पेट्रोलींग करीत असताना कोलपल्ली येथील देवाजी निला सिडाम, दिलीप रामा पोरतेट व संपत पोच्चा आईलवार हे त्यांच्या राहते घरुन देशी विदेशी दारुची अवैध विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरुन त्यांचे राहत्या घरी धाड टाकली असता, देशी-विदेशी दारुसह एकुण 9 लाख 35 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्यामध्ये, रॉकेट देशी दारु संत्रा कंपनीच्या 90 मिली मापाच्या एकुण 10,000 सिलबंद निपा किंमत 8,00,000/- रुपये, किंगफिशर स्टॉग बिअर कंपनीच्या 650 मिली मापाच्या एकुण 80 नग बॉटल किंमत 24,000/- रुपये, हेवर्ड्स 5000 स्टॉग बिअर कंपनीच्या 650 मिली मापाच्या 230 नग सिलबंद बॉटल किंमत 57,500/- रुपये, ऑफिसर चॉईस कंपनीच्या 1000 मिली मापाच्या 54 नग सिलबंद बंपर किंमत 54,000/- रुपये असा एकुण नऊ लाख पसतीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला. संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोउपनि. सागर माने यांचे लेखी फिर्यादीवरुन आरोपी देवाजी निला सिडाम, दिलीप रामा पोरतेट, संपत पोच्चा आईलवार यांचे विरुध्द पोस्टे अहेरी येथे अप क्र. 258/2024 कलम 65 (ई), 83 महा.दा. का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोस्टे अहेरी पोनि. स्वप्नील ईज्जपवार यांचे नेतृत्वात, सपोनि मंगेश वळवी, पोउपनि सागर माने, पोउपनि अतुल तराळे, पोहवा निलकंठ पेंदाम, नापोअं हेमराज वाघाडे, पोअं शंकर दहीफळे, मपोअं राणी कुसनाके, चापोहवा दादाराव सिडाम यांनी पार पाडली.