जिल्ह्यातील चार शिक्षक ठरले राज्य पुरस्काराचे मानकरी
1 min readगडचिरोली, सप्टेंबर ०४: राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२३-२४ ची घोषणा २ सप्टेंबरला झाली. ११० जणांच्या यादीत गडचिरोतील चार शिक्षकांचा समावेश आहे.
शहरातील राणी दुर्गावती कनिष्ठ कला महाविद्यालयाच्या इंग्रजी विषयाच्या उच्च माध्यमिक शिक्षिका संध्या शेषराव येलेकर, चामोर्शी तालुक्याच्या नवेगाव रै. येथील जि. प. उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक आशिष अशोक येल्लेवार यांचा समावेश आहे. त्यांची बिगर आदिवासी क्षेत्रातून निवड झाली, तर आदिवासी क्षेत्रातून धानोरा तालुक्याच्या कारवाफा येथील जि. प. शाळेचे शिक्षक जितेंद्र गोविंदा रायपुरे व एटापल्ली तालुक्याच्या वाळवी येथील जि. प. शाळेचे शिक्षक श्रीकांत गटय्या काटेलवार यांची निवड करण्यात आली. जिल्हाधिकारी संजय दैने, जि.प. सीईओ आयुषी सिंह, शिक्षणाधिकारी (मा.) वासुदेव भुसे यांनी त्यांचे कौतुक आहे.