December 22, 2024

कुरखेडा येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

1 min read

कुरखेडा, सप्टेंबर ११: क्रीडा व युवक सेवा संचालन महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा क्रीडा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेला
दिनांक ९ ते १५ सप्टेंबर पासून स्थानिक श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा यांच्या भव्य क्रीडांगण मैदानात आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष तथा शाळा समिती अध्यक्ष वामनराव फाये साहेब उद्घाटक नायब तहसीलदार राजकुमार धनबाते , प्राचार्य, नागेश्वर फाये, क्रीडा शिक्षक एकनाथ बंडे सर, रेमाजी बावणे सर, एस.बी. मरसकोल्हे ,जितेंद्र बोरकर सर,विलास मेश्राम अस्मिता भैसारे जे.आर मस्के, एस.एस .साहरे डी.आर .ठेला, बी. आर. सोरते सर उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना वामनराव फाये यांनी म्हटले की , शारीरिक आरोग्य सुदृढ राहण्याकरिता प्रत्येक विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळून आपले आरोग्य सुदृढ ठेवले पाहिजे आणि खेळाच्याच माध्यमातून आपला भवितव्य उज्वल केला पाहिजे असे प्रतिपादन फाये यांनी केले.
यावेळी नायब तहसीलदार राजकुमार धनबाते यांनी खेळाडू विद्यार्थ्यांचा परिचय घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.
उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक तालुका क्रीडा सचिव तथा संयोजक प्राचार्य,नागेश्वर दो.फाये यांनी केले तर संचालन क्रीडा शिक्षक रेमाजी बावणे विद्या विकास देऊळगाव यांनी केले तर आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक प्रा.ज्ञानेश्वर देशमुख यांनी मानले.
यावेळी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत विद्यार्थी खेळाडू मोठ्या संख्येत उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!