सोनसरी जंगल परिसरात सुरू असलेली मोहफुल हातभट्टी वर कुरखेडा पोलिसांची कार्यवाही; ३४हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल जप्त
1 min readकुरखेडा, सप्टेंबर २४ : सोनसरी जंगल परिसरात सुरू असलेली मोहफुल हातभट्टी वर कुरखेडा पोलिसांनी कार्यवाही करत ३४४०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
प्राप्त माहितीनुसार बातमीदाराकडून सोनसरी जंगल परिसर 12 किमी दक्षिण भागात मोठ्या प्रमाणात मोहफुल हातभट्टी दारू सुरू असल्याची माहिती कुरखेडा पोलिसांना मिळाली. दिनांक 23/09/2024 रोजी 15.00 वा दरम्यान प्राप्त माहितीच्या आधारे जंगल परिसरात प्रवेश करुन सोनसरी जंगल परिसरात असलेल्या नाल्यालगत ठिकाणी पोहोचले असता प्रेमसिंग फागू वय 50 वर्ष रा. सोनसरी ता. कुरखेडा जि. गडचिरोली हा झुडपी जंगलात हातभट्टी मोहफुलाची दारू गळीत असताना मिळून आला.
घटना स्थळाचा पंचनामा केला असता मोक्यावर मोहा फुलाची दारू व मोहफूल सडवा एकूण 34,400/- रुपयाचा मुद्देमाल हातभट्टीवर मिळून आला. आरोपी प्रेमसिंग फागु याचे विरोधात अपराध क्रमांक व कलम 192/2024 कलम 65(ई), 65(फ) म.दा.का. अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून कुरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास तपास अधिकारी मपोउपनि वर्षा बोरसे करीत आहेत.