April 27, 2025

स्वामित्व योजने अंतर्गत जिल्ह्यातील 64 गावांमध्ये उद्या सनद वाटप

गडचिरोली, 26 डिसेंबर : स्वामित्व योजने अंतर्गत प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील 50 लाखाहून अधिक घरमालकांना मालमत्ता कार्डचे ऑनलाईन वितरण करण्यात येणार आहे. तसेच देशभरातील लाभार्थ्यांशी यावेळी प्रधानमंत्री संवाद साधतील. या योजने अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील 64 गावांमधील घरमालकांना (मालमत्ता कार्ड) सनद वाटप होणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर रोजी सकाळी 11.15 वाजता स्वामित्व योजने अंतर्गत सनद वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित राहणार असून भूमी अभिलेख विभागाच्या जिल्हा अधिक्षक नंदा आंबेकर यांनी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
*स्वामित्व योजनेचे फायदे*
 अत्याधुनिक ड्रोनच्या सहाय्याने गावाठाणातील मिळकतीचे अचूक मोजमाप, नकाशा आणि मालमत्ता पत्रक तयार करणे सोपे व सुलभ झाले आहे.
 सिमा निश्चिती आणि मोजमापाची कामे आता अधिक प्रभावीपणे आणि वेळेत पूर्ण होतील.
 मालमत्तेची कायदेशीर मालकी आणि सुरक्षिततेची हमी
 कर्ज मिळण्याची सुलभ सुविधा
 जमीनीशी संबंधीत मतभेदाचे त्वरित निराकरण
 मालमत्तेचे विभाजन अधिक सुलभ
 गावांच्या आर्थिक प्रगतीला नवी दिशा व चालना

About The Author

You may have missed

error: Content is protected !!