जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी पदभार स्वीकारताच घेतला सर्व विभागांचा आढावा
1 min readगडचिरोली न्यूज नेटवर्क, गडचिरोली , २७ डिसेंबर: नवनियुक्त जिल्हाधिकारी म्हणून अविशांत पांडा यांनी २६ डिसेंबरला संजय दैने यांच्याकडून पदभार स्वीकारला.
मावळते जिल्हाधिकारी संजय दैने यांच्यासह अपर जिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके, जिल्हा परिषदेचे प्रभारी सीईओ राजेंद्र भुयार, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश आघाव पाटील यांनी पांडा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दैने यांची वस्त्रोद्योग आयुक्त म्हणून बदली झाली तर त्यांच्या जागी पांडा यांची नियुक्ती झाली आहे.
याप्रसंगी जिल्हाधिकारी पांडा यांनी जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्याच्या सूचना विभागप्रमुखांना दिल्या.
जिल्ह्यात विकासकामांसाठी मोठा वाव आहे. ही कामे करण्यासाठी मिळालेल्या संधीचा उपयोग करून प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे आणि भविष्यातील योजनांचे नियोजन करणे आवश्यक आहे, असे सांगून त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना एकजुटीने करण्याचे आवाहन केले. काम
यावेळी त्यांनी जिल्ह्यातील महत्त्वाचे विषय व प्रश्न संजय दैने यांच्यासह दुय्यम अधिकाऱ्यांकडून जाणून घेतले.