फुले – शाहू – आंबेडकर, संविधानवादी सामाजिक संघटना तथा बौध्द समाज ता. कुरखेडा च्या वतीने ०३ जानेवारी २०२५ रोजी भव्य निषेध मोर्चाचे आयोजन
1 min readगडचिरोली, ३० डिसेंबर : परभणी, बिड हत्याकांड तसेच राष्ट्रनिर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या अपमानाच्या निषेधार्थ शुक्रवार, दिनांक ०३ जानेवारी २०२५ रोजी, दुपारी १२.०० वाजता कुरखेडा येथे भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्याला आलेले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन ते कुरखेडा शहरातून तहसिल कार्यालय कुरखेडाच्या मार्गाने मोर्चाला सुरूवात होईल असे योजकांनी प्रसिद्धी द्वारे कळविले आहे.
परभणी येथील शहीद भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी तसेच सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटूंबियाना १ कोटी रूपयांची मदत देऊन कुटूंबातील एका व्यक्तिला शासकीय नोकरी देण्यात यावी. बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देऊन त्यांच्या कुटूंबाला १ कोटी रूपयांची मदत देऊन कुटूंबातील एक व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात आवी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रनिर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एकेरी उल्लेख करून त्यांच्या अपमान केल्याबद्दल त्यांना पदावरून हटविण्यात यावे. आदि मागण्या घेवून बौध्द समाज तालुका कुरखेडा यांनी निषेध मोर्चाचे आयोजन केले असून तालुक्यातील समस्त बौध्द , नागरिकांनी मोठ्या संखेत मोर्चात सहभागी व्हावे असे आव्हान आयोजन समितीने केले आहे.