January 9, 2025

शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथे सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोजन

1 min read

कुरखेडा, २ जानेवारी: श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली व्दारा संचालित शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथे सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून आज दिनांक ०२ जानेवारी २०२५ रोज गुरुवारला उदघाटन सोहळा पार पडला.

सदर उदघाटन सोहळ्याचे उदघाटक व प्रमुख वक्ते म्हणून महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय वडसा चे सेवानिवृत्त उच्च माध्यमिक शिक्षक संजय कुथे हे होते. उदघाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थानी शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा चे प्राचार्य डॉ.अविनाश गौरकार हे होते. प्रमुख अतिथी कुरखेडा  पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ , पालक – शिक्षक संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र खोब्रागडे , पालक शिक्षक – संघाचे सहसचिव छायाताई खंडाईत , सेवानिवृत्त शिक्षक सुरेश खेडीकर , माधुरी लांजेवार , प्राध्यापक अशोक मेश्राम हे प्रामख्याने उपस्थित होते .


सांस्कृतिक कला महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख अतिथी असेलेले कुरखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांनी विद्यार्थ्यांना स्वत:च्या आई – वडील यांच्याकरिता , गुरुजन , स्वत:च्या गावाकरिता विकासाकरिता आपल्या ज्ञानाचा उपयोग करा , यशाची पायरी कशी गाठायची , यावेळी स्पर्धा परीक्षेबद्दल माहिती विद्यार्थ्यांना दिली तथा शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या प्रगतीचा क्रम आलेखाप्रमाणे चढता ठेवावा असे आपल्या मार्गदर्शनातून म्हटले.

सदर सांस्कृतिक कला महोत्सवाच्या उदघाटन सोहळ्याच्या वेळी सोहळ्याचे उदघाटक व प्रमुख व्यक्ते म्हणून महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय वडसा सेवानिवृत्त उच्च माध्यमिक शिक्षक संजय कुथे यांनी आपल्या मार्गदर्शनातून म्हटले कि सामान्य विद्यार्थ्यानप्रमाणे विशेष विद्यार्थ्यांनाहि सांस्कृतिक कला महोत्सव महत्वाचे असते . विशेष विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या क्षमतांचा जास्तीत जास्त वापर करून त्यांचे अनुभवविश्व समृद्ध करणे , विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनामध्ये स्वावलंबी बनवणे आणि पुढील आयुष्याच्या दृष्टीने आत्मनिर्भर बनवणे हे विशेष विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे व्यापक उद्दिष्ट अंतिम ध्येय असते . कुठलेही शिक्षण घेत असेलेले व्यक्ती म्हणजे विद्यार्थीच होय .

सांस्कृतिक कला महोत्सवाच्या उदघाटन सोहळ्याचे अध्यक्ष शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा चे प्राचार्य डॉ.अविनाश गौरकार यांनी सांस्कृतिक कला महोत्सव म्हणजे कलाविष्कार , सांस्कृतिक कला महोत्सव म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुप्त कला – गुणांचे प्रदर्शन , सांस्कृतिक कला महोत्सव म्हणजे निर्मळ आनंद विद्याथ्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी क्रमिक अभ्यासाबरोबर विविध स्पर्ध , उपक्रम , सांस्कृतिक कला महोत्सवात या सर्व गोष्टी महत्व पूर्ण ठरतात . भविष्यातील कलाकाराचा पाया इथेच घातला जातो त्यासाठी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कला महोत्सव मध्ये तथा विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला पाहिजे.

सदर सांस्कृतिक कला महोत्सव जानेवारी २०२५ चे औचित्य साधून सोहळ्याचे उदघाटक व प्रमुख व्यक्ते असलेले महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय वडसा सेवानिवृत्त उच्च माध्यमिक शिक्षक संजय कुथे व उदघाटन सोहळ्याचे प्रमुख अतिथी असलेले कुरखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांचे शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा तर्फे शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले .
सदर सांस्कृतिक कला महोत्सव उदघटन सोहळ्याचे संचालान एम.सी.व्ही.सी. विभागाचे प्राध्यापक विवेक गलबले , प्रास्ताविक प्रा कालिदास सोरते तर विद्यालयाचे शिक्षक चंद्रकांत नरुले यांनी आभार मानले . सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील जेष्ठ शिक्षक उद्धव वाघाडे , लीकेश कोडापे , नोगेश गेडाम , राजेश पराते , नरेंद्र कोहाडे , महेंद्र नवघडे , प्रकाश मुंगणकर , जेष्ठ शिक्षिका संघमित्रा कांबळे , सोनिका वैद्य , दिव्या भानारकर , भूमेश्वरी हलामी कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक स्वप्नील खेवले , रुपेश भोयर , गुरुदास शेंडे , मनोज सराटे , मुनेश्वर राऊत , सराटे , आलाम , प्राध्यापिका एम.उरकुडे , निकिता दरवडे शिक्षकेतर कर्मचारी जेष्ठ लिपिक अनिल बांबोळे , क.लीपिक्क लोकेश राऊत , कालिदास मलोडे , शिवा भोयर , घनश्याम भोयर , अक्षय देशमुख तथा विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले .

About The Author

error: Content is protected !!