शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७५ वा वर्धापनदिन साजरा

कुरखेडा , 26 जानेवारी: श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली व्दारा संचालित शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथे आज दिनांक २६ जानेवारी २०२५ रोज रविवारला भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७५ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला .
यावेळी कुरखेडा नगरीतील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व तथा माजी सैनिक पुंडलिकराव तोंडरे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले . याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश गौरकार यांच्या अध्यक्षतेखाली घर घर संविधान याविषयी शपथ घेण्यात आली व प्राचार्यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७५ वा वर्धापनदिनानिमित्य शुभेच्या दिल्या .
याप्रसंगी शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा चे प्राचार्य डॉ.अविनाश गौरकार , संघमित्रा कांबळे विद्यालयातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामचंद्र दखणे , भाऊरावजी बानबले , सेवानिवृत्त शिक्षक सुरेश खेडीकर , महादेव नाकाडे , माधुरी लांजेवार , काळे , घोगरे , कवाडकर , विद्याभारती हायस्कूल पुराडा चे माजी प्राचार्य राजेंद्र बोरकर , प्राचार्य जिभकाटे , कुरखेडा नगरीतील प्रतिष्ठित नागरिक तसेच शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथील सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते .