April 26, 2025

गडचिरोलीत लोह आधारित पूरक उद्योगांना मोठा वाव – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

गडचिरोली : जिल्ह्यातील लोह उद्योगात वाढ होत असल्याने येत्या काळात लोह उत्पादनावर आधारित पूरक उद्योगांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात अधिकाधिक लोह आधारित पूरक उद्योग निर्मितीसाठी उद्योग मित्रांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.

जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित जिल्हा उद्योग मित्र, जिल्हा सल्लागार समन्वय समिती, जिल्हा आजारी उद्योग पुनर्वसन समिती आणि जिल्हा स्थानिक लोकांना रोजगार सनियंत्रण समितीच्या संयुक्त सभेत ते बोलत होते.

जिल्ह्यातील सुशिक्षित युवकांना कौशल्य प्रशिक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत कंपन्यांनी पोर्टलवर नोंदणी करावी, तसेच जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाने युवकांना अधिकाधिक प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

सभेत उद्योजकांच्या अडचणी, औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधा, स्थानिकांना रोजगाराच्या संधी आणि उद्योग केंद्राच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश गायकवाड, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे यांसह जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा अग्रणी बँक, नाबार्ड, खादी ग्रामोद्योग, नगररचना, विज महावितरण कंपनी, एम.आय.डी.सी., कामगार विभाग, खनिकर्म विभाग इत्यादी विभागांचे प्रतिनिधी आणि गडचिरोली जिल्हयातील उद्योग संघटना आणि इतर उद्योजक हजर होते.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!