शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथे निरोप समारंभ

विद्यार्थांना स्वताचे गुण व क्षमता ओळखून आपले ध्येय ठरवावे – प्राचार्य डॉ.अविनाश गौरकार
कुरखेडा, 2 फेब्रुवारी : श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली व्दारा संचालित शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथिल वर्ग १२ वी ( कला , विज्ञान व एम.सी.वी.सी. ) च्या विद्यार्थ्यांना वर्ग ११ वी ( कला , विज्ञान व एम.सी.वी.सी. ) च्या विद्यार्थ्यांकडून निरोप देण्यात आला . या प्रसंगी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले .
निरोप समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश गौरकार होते तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शाळेचे जेष्ठ प्राध्यापक विजय मेश्राम , एम.सी.व्ही.सी. विभागाचे पूर्ण वेळ शिक्षक विवेक गलबले , प्राध्यापक सराटे , वरिष्ठ लिपिक अनिल बांबोळे हे होते .
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून विद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश गौरकार बोलतांना म्हणाले कि विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगताना पुढे जाण्यासा ठी ज्या क्षेत्राची आवड आहे त्या क्षेत्राची निवड करा तसेच अपयश आले तरी खचून न जाता सामना करण्याची जिद्द ठेवावी व आत्मविश्वास , ध्येय , यशस्वी वाटचाली विषयी बद्दल विद्यार्थ्यांना मार्ग सांगितले व शुभेच्छा दिल्या . प्रमुख अतिथी विद्यालयाचे जेष्ठ प्राध्यापक विजय मेश्राम यांनी यांनी विद्यार्थ्यांनी यश कसे संपादन करावे याविषयी मार्गदर्शन केले . एम.सी.व्ही.सी. विभागाचे पूर्णवेळ शिक्षक विवेक गलबले यांनी यांनी उच्च माध्यमिक परीक्षेबद्दल विद्यार्थ्यांना माहिती व मार्गदर्शन केले .
सदर निरोप समारंभाचे औचित्य साधून वर्ग १२ वी च्या विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयाला अखंड महाराचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा भेट दिली .
याप्रसंगी वर्ग १२ वी च्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना कु.चांदणी जनबंधू , प्रिया जेथुमाल , सावी कावळे , लीना खंडाइत , संकेत मुंगमोडे , जयंत गजभे , आयुष बोदेले , अभिनव खोब्रागडे या विद्यार्थ्यांनी सत्र २०२३ – २४ व २०२४ २५ आलेले अनुभव सर्वांन समोर व्यक्त केले .
सदर निरोप समारंभाचे प्रास्ताविक वर्ग ११ विज्ञान चे वर्ग शिक्षक रुपेश भोयर यांनी केले तर सूत्रसंचालन वर्ग ११ विज्ञान ची विद्यार्थिनी उर्वशी सहारे व आभारप्रदर्शन श्रुतिका जांभूळकर हिने मानले ,
कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता विद्यालयाचे प्राध्यापक मनोज सराटे , गुरुदास शेंडे , लीकेश कोडापे , मुनेश्वर राऊत , निकिता दरवडे , आलाम , सराटे व शिक्षकेत्तर कर्मचारी लोकेश राउत , घनश्याम भोयर , अक्षय दशमुख , शिवा भोयर व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्य्यांनी सहकार्य केले .