April 26, 2025

“मंडई” नाही , “जुगार जत्रा” म्हणा! अवैध धंद्यामुळे ग्रामीण परंपरेला गालबोट!

“कोंबडाबाजार, पत्ते, चक्री जुगार सारखे अवैध धंदे बिनधास्त चालविण्यासाठी कुणाची मूक संमती?”

गडचिरोली, १२ फेब्रुवारी : सध्या ग्रामीण भागात मंडई जत्रा सोबत नाट्यप्रयोगाचे आयोजन मोठ्याप्रमाणत सादर केले जात आहेत. झाडीपट्टी रंगभूमीला या आयोजनातून रोजगाराची उपलब्धता होवून नाटक संस्कृती जतन करण्याचे काम होत असले तरी या मंडई भरविण्याचे नावे आता मोठ्या प्रमाणात “जुगार जत्रा” भरविली जात असल्याचे चित्र कुरखेडा तालुक्यात पाहावयास मिळत आहे.

कोंबडाबाजार, पत्ते, चक्री जुगार सारखे अवैध धंदे बिनधास्त पणे या मंडई जत्रेत सुरू आहेत. परंतु अजून एकही कार्यवाही झाल्याचे दिसत नसल्याने या जुगार आयोजनास संबंधित विभागाची पूर्ण संमती संमतीतर नाही ना ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संबंधी समोर येणाऱ्या माहितीवर विश्वास केला तर त्या करिता मोठी रक्कम वसूल केली जात असून कार्यवाही न करण्याची पूर्ण हमी दिली जात असल्याचे बोलले जात आहे. सध्या  कुरखेडा तालुक्यातील गावांमध्ये आयोजित होणाऱ्या मंडई करिता गठीत मंडळ मंडई मधे कोंबडा बाजार पत्ते, चक्री जुगार सारखे अवैध धंदे बिनधास्त चालविण्यासाठी मोठी आर्थिक व्यवहार करीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. गावात मंडई निमित्य गर्दी व्हावी यासाठी या जुगार धंद्या शिवाय पर्याय नसल्याने मंडळाचे पदाधिकारी पैशे पुरवून गावात मंडई निमित्त खास कोंबडा बाजार भरवून घेतात. या कोंबडाबाजारात मोठ्या संख्येने कोंबडे लढाईसाठी आणले जातात. कोंबडा लाडाई दरम्यान तीक्ष्ण हत्यार ज्याला “काती” म्हणतात कोंबड्याच्या पायाला व्यवस्थित बांधली जाते. कोंबड्यांच्या झुंजीत ही काटी ज्या कोंबड्याला पहिले घाव करील तो मृत झालेला कोंबडा हरला घोषित होतो किंवा कोंबडा मैदान सोडून पडाला तरी हरतो. या झुंजी पूर्वी कोंबड्याला सजेल असा समान साईज व वजनी कोंबडा शोधलाजातो व त्यावर पैज म्हणजे जुगार निश्चित केला जातो. या पेज चे रक्कम कोंबडा बाजार भरविण्याकरिता मंडळाकडून निश्चित केलेल्या व्यक्ती कडे जमा केले जातात. कोंबड्यांची झुंज संपल्यानंतर हरलेला कोंबडा व त्यावर लावलेल्या पैजेच्या १० टक्के रक्कम स्वतः कडे ठेवून जिंकलेल्या कोंबड्यावर लावलेले पैसे त्या त्या संबंधित व्यक्तीला दिले जातात. कधी  कधी ही रक्कम लाखोंच्या घरात असते. अश्या जुगाराला या मंडईच्या माध्यमाने प्रोत्साहन देण्याचे काम सध्या ग्रामीण भागात बिनधास्तपणे सुरू आहेत.

या मंडई फक्त कोंबडाबाजार जुगार पर्यंत सीमित राहिलेल्या नसून आता या मंडई मधे चक्री जुगार, पत्ते जुगार ही बिनधास्तपणे सुरू असल्याचे उघडपणे दिसून पडतात. एका मंडईत ४ ते ५ ठिकाणी हे जुगार सुरू असतात. ग्रामीण भागातील लहान मुलांपासून वयोवृद्ध या जुआगराच्या आहारी जावून एका दिवसात हजारो रुपये हरत असल्याचे बोलले जात आहे.

ग्रामीण परंपरांना गालबोट लावण्याचे काम या जुगार जत्रांच्या माध्यमाने होत असल्याने बुद्धिवंतानी मोठी चिंता व्यक्त केली असून या अवैध धंद्यांवर रोकथाम व्हावे अशी मागणी केलेली आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!