प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना कार्यक्रम अंतर्गत तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेचे आयोजन

“शालेय पोषण आहारात तृणधान्य व कडधान्याचा वापर करा, गट शिक्षण अधिकारी प्रवींद्र शिवणकर यांचे प्रतिपादन”
कुरखेडा, १४ फेब्रुवारी: शाळा स्तरावर तृणधान्य व कडधान्याचा सर्वाधिक वापर करून व तृणधान्य व कडधान्य याची योग्य जोपासना करून विद्यार्थी हिताच्या दृष्टिकोनातून शालेय पोषण आहार शिजवा जेणेकरून विद्यार्थ्यांना अन्न खाऊ खाऊस वाटलं पाहिजे याकरिता शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांनी व मदतनिसांनी विशेष काळजी घेतली पाहिजे असे प्रतिपादन गट शिक्षण अधिकारी प्रवींद्र शिवणकर यांनी केले ते शिक्षण विभाग पंचायत समिती कुरखेडा अंतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना कार्यक्रम अंतर्गत तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेत अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी उद्घाटक म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक इंदुरकर अध्यक्ष म्हणून गटशिक्षण अधिकारी प्रवींद्र शिवणकर प्रमुख अतिथी म्हणून विस्तार अधिकारी अनिल मुलकुलवार,केंद्रप्रमुख संजय मेश्राम , मुख्याध्यापक घनश्याम तुलावी, परीक्षक गृहपाल सदाशिव नरताम, तालुका अभियान व्यवस्थापन उमेद सरोज मारेकरी एस एम गुडदे मॅडम,पत्रकार प्रा. विनोद नागपूरकर , कैलास उईके उपस्थित होते.
यावेळी पाककला स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना विस्तार अधिकारी अनिल मुलकुलवार, अशोक इंदुरकर मार्गदर्शन करून जिल्हास्तरीय होणाऱ्या पाककला स्पर्धेत कुरखेडा तालुक्याचा नाव मोठा करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
तालुका स्तरीय पाककला स्पर्धेत नऊ ९ केंद्रातून १७ स्पर्धक सहभागी झाले होते. यावेळी या स्पर्धेत प्रथम क्रमांक सुषमा मंडलवार जिल्हा परिषद शाळा शिवनी केंद्र शिवनी यांनी प्रथम बक्षीस प्राप्त केला तर द्वितीय क्रमांक आशा हलामी केंद्र कुरखेडा यांनी प्राप्त केला तर तृतीय क्रमांक संसरी केंद्रातून लता राऊत यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
प्रथम द्वितीय आणि तृतीय या तिन्ही क्रमांक प्राप्त करणाऱ्यां स्वयंपाक की महिला यांच्या खात्यात ५०००,३५००, व २५०० रुपयांचे बक्षीस त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.
यावेळी परीक्षक म्हणून गृहपाल सदाशिव नरताम, अंगणवाडी पर्यवेक्षिका गुळधे मॅडम व सरोज मारेकरी यांनी स्पर्धेचे परीक्षण करून स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर कुंभरे यांनी केले तर प्रास्ताविक कुमारी रंजनी शेंडे मॅडम यांनी केले तर आभार दीपक क्षीरसागर यांनी मानले.
यावेळी कुरखेडा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये पोषण आहार सिजवणाऱ्या महिला व मदतनीस मोठ्या संख्येत उपस्थित होते.