समाज माध्यमांवरिल अफवांमुळे सामाजिक सलोखा बिघडू नये याची दक्षता घ्या – सहायक पोलिस निरीक्षक प्रियंका अघाव

“कुरखेडा येथे आयोजित शांतता सभेत नगरवासीयांना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्या करिता सहकार्य करण्याचे आवाहन”
कुरखेडा, २२ मार्च : नागपूर येथील हिंसाचारानंतर राज्यात एक्शन मोड वर असलेल्या गृह विभागाने राज्यात समाज माध्यमांद्वारे पसरवल्या जाणाऱ्या अफवा व आक्षेपार्थ पोस्ट वर करडी नजर ठेवली आहे. या संदर्भात दक्षता घेण्याचे आवाहन करण्याकरीता विशेष सभेचे आयोजन पोलिस स्टेशन कुरखेडा येथे करण्यात आले होते.
पोलिस विभागाद्वारे आयोजित सदर सभेत कुरखेडा येथील राजकीय पुढारी , पत्रकार व सर्व समाजातील जबाबदार व्यक्ती उपस्थित होते. उपस्थित लोकांशी संवाद साधत येथील प्रभारी ठाणेदार व सहायक पोलिस निरीक्षक प्रियंका अघाव यांनी आव्हान केले की, समाजमाध्यमाचा वापर करताना सामाजिक बांधिलकी जोपासावी. समाजात तेढ निर्माण करण्यास कारणीभूत अश्या कुठल्याही पोस्ट लिहू नये किंवा फॉरवर्ड करू नये. समाज माध्यमांवरिल अफवांनुळे सामाजिक सलोखा बिघडू नये याची दक्षता घेण्याचे घेण्याचे ही आवाहन त्यांनी केले. अश्या प्रकरणामुळे पोलीसात गुन्हा दाखल झाल्यास युवकांचे भविष्य धोक्यात येतात. नोकरी व इतर कामांकरिता आवश्यक असणारे चारित्र्य प्रमाणपत्र मिळविण्यासाठी खूप अडचण होते. तरी युवकांना अश्या कुठल्याही कृत्यात सहभागी न होण्यासाठी सर्वांनी जनोवजागृती करून सहकार्य करावे असे आवाहन केले.
प्रास्ताविक करतांना पोलिस उपनिरीक्षक वर्षा बोरसे यांनी उपस्थितांच्या सभेला पस्थितीबाबत विशेष आभार मानले व कुरखेडा येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आव्हान केले. पोलीस उपनिरीक्षक डी. एस. भोमे यांनी उपस्थितांना आव्हान केले की आपण आपल्या संपर्कात असलेल्या गावातील सर्व वयोगटातील लोकांना राज्यातील संवेदनशील परिस्थितीवर कसलेही विवादास्पद वक्तव्य व समाजमाध्यम पोस्ट करण्यास टाळण्याचे करावे. अशी एखादी विवादास्पद वा समाजमन दुखावणारी पोस्ट नजरेत पडल्यास पोलिसांच्या ध्यानात आणून द्यावे. अश्या प्रकरणात आयटी कायद्या अंतर्गत गुन्हे नोंद होत असते व अश्या कायद्यात अडकलेल्या लोकांना याचा खूप त्रास होवू शकतो. तरी आपल्या समाजातील युवा लोकांना याबाबत जाणीव जागृती करीत दक्षता घेण्याचे आव्हान करावे असे सांगितले.
सभेला उपस्थित सर्व मान्यवरांनी कुरखेडा येथील सामाजिक सलोख्याची असलेल्या परंपरेचे माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली व कुरखेड्यात कधी जातीय तेढ निर्माण झालेली नाही व भविष्यात ही अशी परिस्थिती उद्भवणार नाही याची ग्वाही दिली.
सदर सभेला भाजपाचे गणपत सोनकुसरे, शिवसेना तालुका अध्यक्ष अनिकेत आकरे, शिवसेना तालुका संघटक ईश्वर ठाकूर, उबाटा नेते सुरेंद्रसिंह चंदेल, नगरसेवक आशिष काळे, वॉइस ऑफ मीडिया तालुका अध्यक्ष विजय भैसारे, भाजपा शहर अध्यक्ष प्रशांत हटवार, पत्रकार महेंद्र लाडे, न्हावी समाज अध्यक्ष खुशाल फूलबांधे, बौद्ध समाज अध्यक्ष हिरा वालदे, जितेंद्र वालदे, रोहित ढवळे, स्वप्नील खोब्रागडे, पत्रकार शिवा भोयर, श्याम लांजेवार, चेतन गहाणे, नसीर हाश्मी प्रामुख्याने उपस्थित होते.