April 25, 2025

बांबू लागवडीमुळे रोजगाराची संधी – येरकड ग्रामसभेचा पुढाकार!

गडचिरोली, एप्रिल : धानोरा तालुक्यातील सामूहिक वन हक्क (CFR) प्राप्त ग्रामसभा येरकड येथे १५ हेक्टर क्षेत्रावर बांबूलागवडीचा महत्त्वाकांक्षी उपक्रम उत्साहात सुरू झाला आहे. या विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन कुंभारे (शाखा अभियंता, रोहयो विभाग, गडचिरोली) आणि श्याम गेडाम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. या उपक्रमामुळे स्थानिक ग्रामस्थांना रोजगाराच्या संधीउपलब्ध होणार असून, पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागणार आहे.

या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. यामध्ये आर. एच. ढवळे (रोहयो विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली), किरण गजलवार (APO), निशा (डाटा एन्ट्री ऑपरेटर), भानारकर सर (TPO, धानोरा), कुणाल गुरणूले (सृष्टीसंस्था, येरंडी), गजानन काटेंगे (अध्यक्ष, ग्रामसभा येरकड), सतीश जनबंधू (मेट), मनोज चव्हाण (मास्टर ट्रेनर), धनंजय ठाकरे(समन्वयक), सायली मेश्राम (कार्यकर्ती, सृष्टी संस्था, येरंडी) आणि डंकलवार साहेब (RO, दक्षिण धानोरा) यांचा समावेश होता. या सर्वांनी मिळून या उपक्रमाला शुभारंभ करत गावकऱ्यांमध्ये नव्या आशेचा संचार केला.

उद्घाटन प्रसंगी कुंभारे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “ग्रामसभा येरकड येथील स्थानिक ग्रामस्थांसाठी सामूहिक वनहक्कांतर्गत बांबू लागवडीद्वारे रोजगार निर्मिती आणि पर्यावरणीय समृद्धी साधणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.” याप्रकल्पातून २६,२३५ मनुष्य दिवस रोजगार निर्माण होणार असून, यामुळे गावातील गरीब आणि बेरोजगारांना मोठा आधार मिळणारआहे. बांबू लागवडीमुळे जमिनीचे संवर्धन, जलसाठवण आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.

कुणाल गुरणूले यांनी आपल्या प्रस्ताविकेत सांगितले की, “मागील तीन वर्षांपासून सृष्टी संस्था धानोरा तालुक्यातील १०ग्रामसभांसोबत वन हक्क कायदा आणि ३० नोव्हेंबर २०२१ च्या शासन निर्णयानुसार सामूहिक वन हक्क प्राप्त ग्रामसभांना महात्मागांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (MGNREGA) माध्यमातून रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहे.” वनावर अवलंबून असलेल्या आदिवासी आणि पारंपरिक समुदायांची उपजीविका सुरक्षित करण्यासाठी आणि त्यांच्या उत्पन्नात वाढहोण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यावर संस्थेचा भर आहे. जल, जमीन आणि जंगलाच्या संवर्धनासाठी स्थानिकांनाप्रशिक्षण देऊन त्यांना MGNREGA प्रकल्पांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न संस्थेने केला आहे.

श्याम गेडाम यांनी आपल्या भाषणात रोजगार हमी योजनेची ताकद अधोरेखित केली. ते म्हणाले, “ही योजना मोठ्या प्रमाणातरोजगार निर्मिती करण्याची क्षमता बाळगते. सामूहिक वन हक्क प्राप्त ग्रामसभांनी योग्य नियोजन करून कामे हाती घेतल्यासगावकऱ्यांना बारमाही रोजगार मिळू शकतो.” यामुळे गरीब आणि गरजू शेतमजुरांची आर्थिक प्रगती होईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आर्थिक वर्ष २०२५२६ साठी रोहयो मजुरी दर ३१२ रुपये असल्याची माहितीही दिली.

डंकलवार साहेब (RO, दक्षिण धानोरा) यांनी ग्रामसभा आणि वन विभाग यांच्या समन्वयाचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, “ग्रामसभांनी तांत्रिक मदतीसाठी संपर्क साधल्यास वन विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी नेहमीच सहकार्य करतील.” बांबूलागवडीसारख्या उपक्रमांमुळे पुढील चांगली कामे होऊ शकतील, असेही त्यांनी नमूद केले.

सामूहिक वन हक्क क्षेत्रात बांबू लागवड हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. यामुळे पर्यावरण संरक्षण, जमिनीचे संवर्धन आणि स्थानिकअर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. बांबू हे जलद वाढणारे पीक असून, त्यापासून फर्निचर, हस्तकला वस्तू आणि इतर उत्पादनेतयार करून गावकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळू शकेल. यामुळे स्थानिक बेरोजगारी कमी होण्यासोबतच वनसंवर्धनालाही गतीमिळेल.

या उद्घाटन सोहळ्याला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला आणि प्रकल्पाच्यायशस्वीतेसाठी पूर्ण पाठिंबा दर्शविला. गावकरी विजय मडावी म्हणाले, “आम्हाला आता गावातच काम मिळणार आहे. बांबूलागवडीमुळे आमच्या मुलांचे भविष्यही सुधारेल.”

कार्यक्रमाच्या शेवटी मनोज चव्हाण यांनी उपस्थित सर्व संस्था कार्यकर्ते, शासकीय कर्मचारी, अधिकारी आणि ग्रामसभेतील महिला पुरुषांचे आभार मानले. त्यांनी या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्वांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.

रोहयो विभाग, सृष्टी संस्था आणि स्थानिक समुदायाच्या सहभागाने सुरू झालेला हा बांबू लागवडीचा उपक्रम पर्यावरण आणिरोजगाराच्या क्षेत्रात एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे. ग्रामसभा येरकडचा हा पुढाकार इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरेलआणि ग्रामीण विकासाचा एक नवा मार्ग उघडेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!