April 25, 2025

मुनघाटे महाविद्यालयात ‘स्पीक मॅके’ क्लबची स्थापना व सामंजस्य करार: सांस्कृतिक वारसा जपण्याचा संकल्प

कुरखेडा, ३ एप्रिल: दंडकारण्य शैक्षणिक सांस्कृतिक विकास संशोधन संस्था, गडचिरोली द्वारा संचालित श्री गोविंदराव मुनघाटे कला विज्ञान महाविद्यालयानेस्पीक मॅके’ (SPIC MACAY – Society for the Promotion of Indian Classical Music And Culture Amongst Youth) या संस्थे सोबत सामंजस्य करार करून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. याकरारासोबतच महाविद्यालयातस्पीक मॅकेक्लबची स्थापना करण्यात आली असून, यामुळे विद्यार्थ्यांसह परिसरातील युवकांमध्ये भारतीय शास्त्रीय संगीत, संस्कृती आणि कलेची अभिरुची वाढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

स्पीक मॅकेही १९८८ मध्ये स्थापन झालेली संस्था असून, ती जागतिक स्तरावर युवकांमध्ये शास्त्रीय संगीत आणि भारतीय संस्कृती प्रसार करण्यासाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या सहकार्याने मुनघाटे महाविद्यालयाने हा करार केला असून, या क्लबचा उद्देश भारतातील सांस्कृतिक वारसा जपणे, सांस्कृतिक जागरूकता निर्माण करणे, विविध क्षेत्रातील कलाकारांशी संवाद साधणे, रचनात्मक कार्याला चालना देणे आणि राष्ट्रीय ऐक्याची भावना वृद्धिंगत करणे हा आहे. महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या मार्गदर्शनाखाली या क्लबची स्थापना नुकतीच झाली असून, यामुळे महाविद्यालयात हेरिटेज क्लब कार्यान्वित झाला आहे.

स्पीक मॅकेक्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, रंगमंच, पारंपारिक चित्रकला, शिल्पकला, योग आदी कलागुणांचा विकास करण्यावर भर दिला जाणार आहे. या शिवाय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्गदर्शक महाविद्यालयात येवून  विद्यार्थ्यांना प्रेरणा देतील. भविष्यात या क्लबच्या सहकार्याने फिल्म फेस्टिव्हल, नॅचरल वॉक यांसारखे उपक्रम गडचिरोली जिल्ह्यातील  युवकांसाठी राबवले जाणार आहेत. दंडकारण्य शिक्षण संस्थेने या उपक्रमांसाठी पूर्ण तयारी दर्शवली आहे.

मुनघाटे महाविद्यालयाने यापूर्वीही सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. यावर्षी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने दहा दिवसीय नाट्य प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, फिल्म फेस्टिव्हलचे यशस्वीआयोजनही झाले आहे. दंडकारण्य शिक्षण संस्थेने भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय आणि दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांच्या सहकार्यानेभारत भारती राष्ट्रीय लोकनृत्य महोत्सवया तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या सर्व उपक्रमांमुळे महाविद्यालयाचा सांस्कृतिक ठसा अधिक गडद झाला आहे.

गोंडवाना विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातच नव्हे, तर संपूर्ण पूर्व विदर्भातस्पीक मॅकेक्लब स्थापन करणारे मुनघाटे महाविद्यालय हे पहिले  महाविद्यालय ठरले आहे. या क्लबचे राष्ट्रीय समन्वयक सभ्यशाची डे यांनी प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्याशी सामंजस्य करार बाबत चर्चा केली. क्लबचे तांत्रिक सल्लागार म्हणून आयक्यूएसी समन्वयक प्रा. डॉ. अभय साळुंखे, चेअरमन म्हणून प्रो. नरेंद्रआरेकर, समन्वयक म्हणून डॉ. गुणवंत वडपल्लीवार आणि मार्गदर्शक निमंत्रित सदस्य म्हणून पद्मश्री डॉ. परशुरामजी खुणेकार्यरत आहेत. याशिवाय, डॉ. राखी शंभरकर, डॉ. रवींद्र विखार, डॉ. दीपक बनसोड आणि डॉ. हेमराज मेश्राम हे सदस्य म्हणूनसहभागी आहेत.

या क्लबच्या माध्यमातून कुरखेडा परिसरातील आणि गडचिरोली जिल्ह्यातील उत्साही लोककलावंतांना आणि व्यावसायिक कलाकारांना त्यांच्या कलेला व्यासपीठ मिळणार आहे. आयोजकांनी सर्व कलाकारांना या क्लबचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. या उपक्रमामुळे स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळून त्यांचा विकास होण्यास मदत होईल.

स्पीक मॅकेक्लबची स्थापना आणि सामंजस्य करार हे मुनघाटे महाविद्यालयाच्या सांस्कृतिक शैक्षणिक प्रगतीतील एक महत्त्वाचे पाऊल आहे. या क्लबमुळे विद्यार्थ्यांसह परिसरातील युवकांमध्ये सांस्कृतिक मूल्यांचा प्रसार होऊन भारतीय वारशाचे संवर्धन होईल, अशी अपेक्षा आहे. हा उपक्रम भविष्यात गडचिरोली जिल्ह्याच्या सांस्कृतिक उन्नतीसाठी मोलाचा ठरेल, यात शंका नाही.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!