April 26, 2025

गडचिरोलीत अत्याधुनिक संगणकीकृत भू-प्रणाम केंद्राचे उद्घाटन, जलद सेवा पुरविण्यासाठी प्रभावी पाऊल – सुनील सूर्यवंशी

गडचिरोली, 4 एप्रिलउपअधीक्षक भूमी अभिलेख, गडचिरोली यांच्या कार्यालयात सेतु केंद्राच्या धर्तीवर अत्याधुनिक संगणकीकृतभूप्रणाम केंद्राची स्थापना करण्यात आली असून, या केंद्राचे उद्घाटन आज निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सुनील सूर्यवंशी यांच्याहस्ते करण्यात आले.

या केंद्रामार्फत नागरिकांना मिळकत पत्रिका, सातबारा उतारा, रंगीत नकाशा तसेच अन्य आवश्यक अभिलेख शासकीय शुल्क भरूनएकाच ठिकाणी सहज उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नागरिकांना विविध कार्यालयांत चकरा मारण्याची गरज भासणार नाही आणित्यांच्या वेळेची बचत होईल. भूप्रणाम केंद्रामुळे शासकीय सेवा नागरिकांच्या अधिक जवळ गेल्या आहेत. हे केंद्र नागरिकांसाठीपारदर्शक जलद सेवा पुरविण्यासाठी एक प्रभावी पाऊल ठरेल असे श्री सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितले

याप्रसंगी मौजा चुरमुरा येथील मनोहर नानाजी राऊत आणि रत्नमाला पत्रु लोणारे यांना स्वामित्व योजनेअंतर्गत प्रातिनिधीकस्वरूपात सनद वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला अधिक्षक भूमी अभिलेख च्या अधिक्षक नंदा आंबेकर, उपअधिक्षक योगेश कांबळे, जिल्हा माहिती अधिकारी गजाननजाधव तसेच भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!