वॉइस ऑफ मीडिया, एटापल्ली तालुक्यात नव्या नेतृत्वाची धमाकेदार सुरुवात: कार्यकारिणी गठीत, स्थानिक माध्यम क्षेत्रात नवचैतन्याची अपेक्षा

एटापल्ली, ११ एप्रिल २०२५: एटापल्ली येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी वॉइस ऑफ मीडिया या संघटनेच्या तालुका कार्यकारिणीची घोषणा एका दिमाखदार बैठकीत करण्यात आली. जिल्हा अध्यक्ष व्यंकटेश दुडूमवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि सचिव विलास ढोरे तसेच जिल्हा कार्याध्यक्ष नसीर हाशमी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. या बैठकीत रवींद्र रामगुंडेवार यांची तालुका अध्यक्षपदी, तर तेजस गुज्जलवार यांची सचिव पदी निवड झाली. या नव्या नेतृत्वामुळे स्थानिक पातळीवर माध्यम क्षेत्रात नवचैतन्य निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, प्रदेश कार्याध्यक्ष मंगेश खाटीकआणि विदर्भ अध्यक्ष किशोर कारंजेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांमध्ये नव्या कार्यकारिणी गठीत करण्याचे काम जोमाने सुरू आहे. या बैठकीत एटापल्ली तालुका कार्यकारिणीच्या इतर महत्त्वाच्या पदांवरही काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
नव्या कार्यकारिणीची रचना:
– तालुका अध्यक्ष : रवींद्र रामगुंडेवार
– सचिव : तेजस गुज्जलवार
– उपाध्यक्ष : जनार्धन नल्लावार, शैलेश आकूलवार
– कोषाध्यक्ष : गजानन खापणे
– तालुका कार्याध्यक्ष : राकेश तेलकुंटलवार
– सहसचिव : तनुज बल्लेवार
– संघटक : मुकेश कावळे
– ज्येष्ठ सल्लागार : विनोद चव्हाण
– जिल्हा कार्यकारिणी सदस्य : शेशराव संगीडवार, आनंद बिश्वास
– कार्यकारिणी सदस्य : शशांक नामेवार, महेंद्र सुल्वावार, मणिकंठ गादेवार, विश्वनाथ जांभुडकर, प्रशांत मंडल
या नव्या कार्यकारिणीच्या निवडीमुळे स्थानिक पत्रकारिता आणि माध्यम क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी स्थानिक समस्यांना वाचा फोडण्या सोबतच पत्रकारांच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केला. गडचिरोली जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही लवकरच अशा बैठका आयोजित करून कार्यकारिणी गठीत करण्याचे नियोजन आहे.
वॉइस ऑफ मीडियाच्या या पुढाकारामुळे ग्रामीण आणि निमशहरी भागातील पत्रकारांना एक व्यासपीठ मिळाले असून, येत्या काळात त्यांच्या कार्याची व्याप्ती वाढण्याची अपेक्षा आहे.