अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवणाऱ्या नराधमाला आष्टी पोलिसांनी दोनच दिवसांत गजाआड केले!

गडचिरोली, ३ मे : गडचिरोली जिल्ह्यातील कोणसरी गावात एका सनसनाटी घटनेने संपूर्ण परिसर हादरला! 24 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10:30 ते दुपारी 3:00 च्या दरम्यान एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार घडला. मात्र, आष्टी पोलिसांनी आपल्या चपळाईने आणि तांत्रिक तपासाच्या बळावर अवघ्या 48 तासांत आरोपी वैष्णव गणपती मोटघरे (रा. जूनगाव, ता. पोंभुर्णा, जि. चंद्रपूर) याला राजस्थानच्या कोटा येथून बेड्या ठोकल्या!
फिर्यादी योगेश रामाजी वाटगुरे (वय 45, शेतकरी, रा. कोणसरी) हे रंग खरेदीसाठी आष्टीला गेले असताना, आरोपीने त्यांच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले. योगेश यांनी 25 एप्रिल रोजी रात्री 1:41 वाजता आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हा क्रमांक 97/2025 अंतर्गत कलम 137(2) भा.द.सं. 2023 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला.
उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे आणि अपर पोलीस अधीक्षक कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजीत तुतूरवाड, पोलीस शिपाई सतीश गुडा, मपोशी पायल ताराम आणि चापोशी राऊत यांच्या विशेष पथकाने तातडीने तपासाला सुरुवात केली. आरोपीच्या मोबाइल लोकेशनचा माग काढत पोलिसांनी थेट कोटा, राजस्थान गाठले. तिथे पीडित मुलीला सुखरूप ताब्यात घेत आरोपी वैष्णव मोटघरे याला अटक केली.
या गुन्ह्यात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सध्या सुरू आहे. आष्टी पोलिसांच्या या त्वरित कारवाईमुळे परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. ही घटना समाजात मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणण