March 7, 2026

कंकडालवार यांचे उपोषण तूर्तास स्थगित; वडेट्टीवार, किरसान यांच्या मध्यस्थीने तोडगा

“अहेरी-भामरागडमधील अनियमितता, पदभरती प्रकरण विधानसभेत गाजणार”

गडचिरोली, १० जुलै :  अहेरी आणि भामरागड तालुक्यातील शासकीय योजनांमधील अनियमितता आणि नियमबाह्य पदभरतीच्या आरोपांवरून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी गडचिरोली जिल्हा परिषद कार्यालयासमोर बुधवारपासून सुरू केलेले बेमुदत आमरण उपोषण आज तूर्तास स्थगित करण्यात आले. काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांच्या मध्यस्थीने हा तोडगा निघाला.

गुरुवारी कंकडालवार यांच्या उपोषण मंडपाला भेट देऊन वडेट्टीवार आणि किरसान यांनी त्यांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा केली. दोषींवर प्रशासकीय कारवाईसाठी पाठपुरावा आणि गरज पडल्यास चालू पावसाळी अधिवेशनात सर्व मुद्दे उपस्थित करण्याचे आश्वासन वडेट्टीवार यांनी दिले. या आश्वासनाने समाधान व्यक्त करत कंकडालवार यांनी उपोषण मागे घेतले. वडेट्टीवार आणि किरसान यांनी त्यांना निंबू शरबत पाजून उपोषण सोडविले.

यावेळी आदिवासी सेल काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष हणमंतू मडावी, ज्येष्ठ नेते अशोक रापेल्लीवार, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा ॲड. कविता मोहोरकर, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नवघरे, स्वीकृत नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, कार्तिक तोगम, अज्जू पठाण, राजू दुर्गे, शिवराम पुल्लुरी, नरेश गर्गम, उमेश रामटेके, सचिन पांचार्या, प्रमोद गोडसेलवार, पिंटू मडावी, प्रवीण कोरेत, शोभन कोंड्रावार आदी उपस्थित होते.

अहेरी आणि भामरागड तालुक्यातील कथित अनियमितता आणि पदभरतीच्या मुद्द्यांवर आता महाराष्ट्र विधानसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!