गडचिरोलीच्या सीमेवर नवे राजकीय समीकरण, दीपक आत्रामांनी घेतला मोठा निर्णय
1 min readगेल्या काही महिन्यांपासून दीपक आत्राम यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
गडचिरोली, 05 फेब्रुवारी : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी स्थापन केलेल्या भारत राष्ट्र समिती या पक्षामध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आदिवासी विद्यार्थी संघटनेचे माजी आमदार दीपक आत्राम यांचा प्रवेश निश्चित झाला असून आज नांदेड येथे हा पक्षप्रवेश होत आहे. दक्षिण भागात विधानसभेसह जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपंचायतीच्या राजकारणातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश होणार असल्याने जिल्ह्याच्या राजकारणात नवे समीकरणे उदयाला येण्याची शक्यता आहे.