September 7, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

ग्रामसेवकाची पुरातून सुटका; स्थानिक युवकांचा प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली

गडचिरोली, २४ जुलै : मुलचेरा तालुक्यातील गोमणी येथील ग्रामसेवक उमेश धोडरे (वय ४५) यांची कोलपल्ली नाल्याच्या अचानक वाढलेल्या पुरातून स्थानिक युवकांनी सतर्कतेने सुटका केली. आज सायंकाळी ३:३० ते ४:०० च्या सुमारास धोडरे आपल्या चारचाकी वाहनासह नाला ओलांडत असताना जोरदार पाण्याच्या लोंढ्याने वाहन वाहून गेले. प्रसंगावधान राखत त्यांनी जवळच्या झाडाला धरून स्वतःला वाचवले.

घटनेची माहिती मिळताच गोमणी येथील स्थानिक युवकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. समन्वयाने आणि काळजीपूर्वक राबवलेल्या बचाव कार्याद्वारे धोडरे यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळाले. त्यानंतर महसूल विभाग, पोलीस आणि स्थानिक बचाव पथकाने त्यांना तातडीने मुलचेरा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक तपासणीसाठी रवाना केले.

या घटनेत स्थानिक युवकांच्या सतर्कतेमुळे आणि जिल्हा प्रशासनाच्या वेळीच घेतलेल्या कृतीमुळे मोठी दुर्घटना टळली. सध्या मुसळधार पावसामुळे नाल्यांना पूर येण्याच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि पूलावरून पाणी वाहत असताना वाहन न टाकण्याचे आवाहन केले आहे.

या घटनेने स्थानिक समुदायाच्या एकजुटीचे आणि प्रशासनाच्या तत्परतेचे उदाहरण समोर आले आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!