कोरची येथे स्वावलंबन पोर्टल च्या माध्यमातून दिव्यांग प्रमाणपत्र, युडी आयडी कार्ड वितरित
1 min readजिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्वानाने समावेशित शिक्षण उपक्रमात बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी स्वालंबन ऑनलाईन पोर्टल च्या माध्यमातून दिव्यांग प्रमाणपत्र तसेच युडी आयडी कार्ड देण्यासाठी तपासणी व निदान विशेष मोहीम कार्यक्रमांतर्गत बुद्धिगुणांक चाचणी शिबिर कोरची तालुक्यातील गटसाधन केंद्र पंचायत समिती कोरची व जिल्हा परिषद शाळा बोरी येथे दिनांक 2 जानेवारी 2023 ला घेण्यात आले तालुक्यातील एकूण 45 दिव्यांग विद्यार्थ्यांची मानसोपचार तज्ञमार्फत बुद्धिगुणांक चाचणी व तपासणी करण्यात आली
शिबिराला प्रामुख्याने पंचायत समिती कोरची गटविकास अधिकारी माननीय राजेश फाये , गटशिक्षणाधिकारी यशवंत टेंभुने, अभिजीत राऊत जिल्हा समन्वयक संजय नांदेकर समग्र शिक्षा अभियान गडचिरोली, मानसोपचार देवयानी चोपडे, ऋषाली विभुते, यांनी भेट दिली,
राजेश फाये गटविकास अधिकारी यांनी पालक व विद्यार्थी उपस्थित राहण्यासाठी व सदर शिबिराचा लाभ सर्व तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी अथक प्रयत्न केले व त्यांच्याच मार्गदर्शनात गटसाधन केंद्रातील राकेश मोहूर्ले, राजकुमार आडे ,शिवाजी वाघमारे तसेच गट साधन केंद्रातील कर्मचारी शिबिर येशस्वितेकरिता सहकार्य केले