March 7, 2026

चाळीस दिवसांचा ठिय्या: ढोल वाजले, पण सत्य कधी बाहेर येणार?

” आंदोलन चाळीसव्या दिवशी तीव्र; वन विभागाविरोधात “ढोल बजाओ” आंदोलन”

वडसा, २९ जुलै : वडसा येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर गेल्या चाळीस दिवसांपासून सुरू असलेले बेमुदत ठिय्या आंदोलन आज “ढोल बजाओ” आंदोलनात रूपांतरित झाले. वन विभागातील भ्रष्टाचार आणि गैरकारभाराविरोधात श्रीकृष्ण वाघाडे, शंकर ढोलगे, रवींद्र सेलोटे, विलास भानारकर आणि प्रवीण ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे शांततापूर्ण आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्त्यांनी वन विभागाच्या सुस्त कारभाराला जाग यावी आणि तक्रारींवर तातडीने कारवाई व्हावी, यासाठी ढोल-नगाऱ्यांचा गजर करत निदर्शने केली.

आंदोलनकर्त्यांनी आरमोरी वनपरिक्षेत्रात रात्रीच्या वेळी मुरूम उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्या कंपनीवर बोगस जप्ती कारवाई दाखवून वनपरिक्षेत्र अधिकारी आणि वनरक्षकांनी आर्थिक लाभ घेतल्याचा आरोप केला आहे. तसेच, पोर्ला वनपरिक्षेत्रात रात्रीच्या वेळी वन परिसरातून वाहतूक, टीसीएम बुजवणे आणि तार कंपाऊंड तोडून वन संपत्तीला हानी पोहोचवल्याप्रकरणी वनगुन्हा नोंदवण्याची मागणी आहे. यासंदर्भात तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मेहर आणि क्षेत्र सहाय्यक अरुण गेडाम यांनी कंपनीला आर्थिक हेतूने सहकार्य केल्याचा आरोप आहे. आंदोलनकर्त्यांनी जेपी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीवर वनगुन्हा नोंदवून त्यांची वाहने जप्त करण्याची आणि संबंधित अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करण्याची मागणी केली आहे.

चाळीस दिवसांपासून शांततापूर्ण आंदोलन करूनही वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक बी. वरूण यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे. पुरावे सादर करूनही उपवनसंरक्षकांनी कंपनीच्या बाजूने चुकीचा अहवाल सादर करत तक्रारकर्त्यांची दिशाभूल केल्याने आंदोलनकर्त्यांना “ढोल बजाओ” आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने विचारणा करूनही उपवनसंरक्षकांनी कोणतेही ठोस उत्तर न दिल्याने त्यांची निष्क्रिय अधिकाऱ्याची प्रतिमा परिसरात निर्माण झाली आहे.

आंदोलनकर्त्यांनी वन विभागाने तक्रारींवर तात्काळ कारवाई न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. “आम्ही गेल्या चाळीस दिवसांपासून शांततेने मागण्या मांडत आहोत, पण वन विभागाचे कान बंद आहेत. आज ढोल वाजवून त्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला. तरीही कारवाई झाली नाही, तर आम्ही आणखी तीव्र पावले उचलू,” असे श्रीकृष्ण वाघाडे यांनी सांगितले.

या प्रकरणी स्थानिक प्रशासन आणि वन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. आंदोलनकर्त्यांनी उपवनसंरक्षक बी. वरूण यांच्यावर दबाव आणण्यासाठी आणि जनजागृतीसाठी ढोल-नगाऱ्यांचा वापर केला. या आंदोलनानंतर तरी वन विभाग जागृत होईल आणि दोषींवर कारवाई होईल, अशी आशा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. स्थानिक नागरिकांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून

About The Author

You may have missed

error: Content is protected !!