December 23, 2024

भारतीय जनता पक्षाचा गुंडाम् गावात प्रवेश सोहळा संपन्न;

1 min read

प्रदेश सदस्य संदीप कोरेत भाजपा तालुकध्यक्ष विजय नल्लावार यांच्या प्रमुख उपस्थितीत.

एटापल्ली, प्रतिनिधी:
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी च्या पूर्वी भारतीय जनता पक्षाची जिल्ह्यात मोर्चे बांधणी.
जिल्हा अध्यक्ष भाजपा किसन जी नागदेवे यांच्या मार्गदर्शनात तालुका अध्यक्ष विजय नल्लावर यांच्या उपस्थितीत प्रदेश सदस्य आदिवासी आघाडी महाराष्ट्र राज्य भाजपा युवा नेता संदिप कोरेत यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्याच्या अतिसंवेदशील कासणसुर पंचायत समिती गुंडांम या गावात बैठक घेण्यात आली.
बैठकीत तालुक्यातील प्रत्येक बूथ जिंकण्यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने तयार व्हावे असे आव्हान केले आहे. भारतीय जनता पार्टी हे पक्ष प्रत्येक गावात व प्रत्येक गावातील प्रत्येक घरात कोणत्या न कोणत्या माध्यमांनी पोहचले आहे . आता आपल्याला लोकहिताच्या योजना देशाचे पंतप्रधान मोदीजी च्या नेतृत्वात संपूर्ण भारत भर राबविणार आहे. ही योजना प्रत्येक गावात प्रत्येक घरात जाऊन सांगा असे आव्हान या वेळी मार्गदर्शन केले. परिसरातील शेकडो लोकांनी भाजपाच्या विकासात्मक कामाला पाहून व देशात सुरु असलेले मोदींजीचे नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्ष प्रवेश केला. यावेळी कालिदास सिडाम , अनिल सिडाम, राहुल इष्टाम, बाजू गावडे, झुरु आतला, बाबुराव आतला, अर्जुन सिडाम, मधुकर कावळे, सखाराम आदें, रायसू कोवाची, रामजी हेडो, रामुलू, हेडो व ईतर लोकांनी भाजपा चा झेंडा हाती घेतला. देशातल्या सर्वात मोठया पक्षात प्रवेश सोहळा पर पडला. सारवांचे पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी भाजपा कसनसुर पंचायत समिती चे व तालुका पदाधिकारी राजू लेनगुरे,दामोधर नरोटे,विश्वनाथ शेंडे,मनोज कोवासे,विष्णुदास कोंदामी रशिनाथ गावडे,सुधाकर कोबासे
निलेश वाढई,सुखदेव गेडाम रवींद्र निकोडे, बालाजी मडावी,हिरामण कावळे बंडु इश्टम,तुकाराम कावळे,सुखराम आदे, गुरुदास चौधरी,हिरामण सिदाम,
रवींद्र इश्टाम,कालिदास शिदाम, गजानन वड्डे,बाबुराव हलामी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते

About The Author

error: Content is protected !!