September 6, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

आनंद अजगांवकर, अहेरी, २२ ऑगस्ट : भामरागड तालुक्यातील भटपर गावात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली, ज्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मूळचे हालेवाडा (ता. बैरमगड, जि. बिजापूर) येथील रहिवाशी असलेले श्री टोका डोलू मज्जी (वय 36) यांचे प्रेत आज सकाळी 9:00 वाजताच्या सुमारास गावाजवळील नाल्याच्या पाण्यात तरंगताना आढळले. गेल्या 10 वर्षांपासून ते भटपर येथे श्री विठ्ठल वत्ते मडावी यांच्या घरी घरजवाई म्हणून राहत होते.

प्राप्त माहितीनुसार, काल दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी टोका मज्जी हे अंघोळ करण्यासाठी घराजवळच्या शेतालगत असलेल्या नाल्यावर गेले होते. कुणालाही न सांगता ते घराबाहेर पडले. त्यांना फिट येण्याचा आजार होता आणि नाल्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले असावे, अशी प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.

आज सकाळी त्यांचा शोध घेतला असता, नाल्यावर पाण्यात प्रेत तरंगत असल्याचे स्थानिकांना दिसले. यानंतर महसूल सेवक सुरेश मज्जी यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यांच्या मदतीने प्रेत पाण्यातून बाहेर काढण्यात आले. या घटनेने गावकऱ्यांमध्ये भीतीचे आणि दुखाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टोका डोलू मज्जी यांच्या मागे त्यांची पत्नी श्रीमती चुक्को टोका मज्जी, मुली प्रियंका टोका मज्जी, करिष्मा टोका मज्जी आणि मुलगे आकाश टोका मज्जी व ईश्वर टोका मज्जी असा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल, असे सांगण्यात येत आहे.

ही घटना परिसरात चर्चेचा विषय बनली असून, स्थानिक प्रशासनाने पुढील तपास सुरू केला आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!