December 23, 2024

विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज आमंत्रित

1 min read

गडचिरोली, प्रतिनिधी;दि.0५: विमुक्त् जाती भटक्या जमाती प्रवर्गातील धनगर समाजाच्या ज्या विद्यार्थ्यांना शासकिय वसतीगृहात अर्ज करुनदेखील शासकिय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना इयत्ता 12 वी नंतरच्या मान्यता प्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभुत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना “पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम योजना” अंतर्गत शिक्षण घेता यावे अशा विद्यार्थ्यांना भोजन,निवास, व इतर शैक्षणिक सुविधा स्वत: उपलब्ध करून घेणेसाठी आवश्यक ती रक्क्म विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करणेकरिता शासनाने दि.06 सप्टेंबर 2019 च्या सुधारित शासन निर्णयान्वये “पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम योजना” सुरु करण्यात आलेली आहे.या योजनेचा लाभ घेणेकरिता विद्यार्थ्यांना इयत्ता 12 वी नंतरच्या नंतरचे उच्च शिक्षण मान्यता प्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभुत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला असावा.विद्यार्थि हा अभ्यासक्रमांमध्ये प्रॉपर जिल्हयाच्या ठिकाणी असलेल्या विविध स्तरातील महाविद्यालयात/शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेला असावा.या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना इयत्ता 12 वी च्या परिक्षेमध्ये 60% गुण असणे अनिवार्य आहे.

या योजनेमध्ये दिव्यांग(विजाभज प्रवर्गातील धनगर समाज)प्रथम आरक्षण असेल.या योजनेचा लाभ घेणेसाठी विद्यार्थ्याने विजाभज,इमाव,विमाप्र,कल्याण विभागच्या महाडिबीटी पोर्टलवरील अर्ज मंजुर झालेला असावा.सदर योजनेचा लाभ घेणेकरिता विद्यार्थ्याचे वय 28 वर्षापेक्षा अधिक नसावे.सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी सन 2022-23 या शैक्षणिक सत्राकरिता विद्यार्थ्यांनी दि.16 फेब्रुवारी 2023 पर्यंत सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण, गडचिरोली यांचेकडे अर्ज सादर करण्यात यावे. सदर योजनेचा लाभ घेणेसाठी विहीत अर्जाचा नमुना सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण ,गडचिरोली या कार्यालयात उपलब्ध आहे. असे आवाहन सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,गडचिरोली यांनी केले आहे.

About The Author

error: Content is protected !!