September 6, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

कोषागार वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

वर्धापन दिनानिमित्ताने जिल्हा कोषागार कार्यालयात रक्तदान शिबीर, सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यांत आले.

गडचिरोली, (जी एन एन)दि.06 : जिल्हा कोषागार कार्यालय, गडचिरोली येथे 01 फेब्रुवारी रोजी वर्धापन दिन मोठ्या आनंद हर्षउल्हासाने साजरा करण्यांत आला. वर्धापन दिनानिमित्ताने जिल्हा कोषागार कार्यालयात रक्तदान शिबीर, सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यांत आले. त्यानिमित्ताने उमेश गायकवाड मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परीषद, गडचिरोली यांच्या हस्ते रक्तदान शिबीराचे उदघाटन करून त्यांनी स्वतः रक्तदान केले. तसेच लक्ष्मण लिंगालोड कोषागार अधिकारी, अभिजीत मेंगडे सहा.संचा.स्था. नि.ले तसेच कोषागार कार्यालयातील अप्पर कोषागार अधिकारी कुसराम, मनोज कंगाली, श्री.उके आणि कार्यालयातील उपकोषागार अधिकारी श्रीमती. चहारे, श्री. पोलके, श्री. मुधोळकर, श्री. ढोंगे, श्री. खापरे, हे उपस्थित होते.त

सेच इतर कार्यालयात कार्यरत वित्त विभागाचे सहाययक लेखा अधिकारी , श्री. तलमले, श्री. मेश्राम, श्री. धात्रक, श्री. वाळके, बोरसरे, श्री. दहीकर, श्री. सोनकर, श्री. वासनिक व श्री. सचिन भांडरे लिपिक यांनीसुध्दा वर्धापन दिनानिमित्याने रक्तदान शिबीरामध्ये रक्तदान करून मोलाचा कामगीरी बजावली. तसेच जिल्हा कोषागार कार्यालयातील व स्थानिक निधी लेखा गडचिरोली कार्यालयातील अनेक कर्मचारी श्री. गावंडे, श्री. चाटे, श्री. लंबे श्री. किरंगे, श्री.श्रुभम यांनी सुध्दा रक्तदान करुन 1 फेब्रुवारी कोषागार वर्धापन दिन उत्साहात साजरा केला.

रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेणा-या अधिकारी व कर्मचारी यांना प्रमाणपत्र देण्यांत आले. त्यानंतर कार्यालयात सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यांत आला व शेवटी वर्धापन दिनाची सांगता करण्यांत आली.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!