कुरखेडा येथील आंबेडकर चौकात अंगावर भिंत कोसळून मजूर गंभीर जखमी.
1 min readकुरखेडा, 08/02/2023
कुरखेडा येथील आंबेडकर चौकामध्ये घरकुलाचे बांधकामा करिता जुन्या इमारतीचे तोडफोड करत असताना अंगावर भिंत पडून येथील रमेश महागु तुलावी वय ३५ वर्ष हा गंभीरचा जखमी झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार कुरखेडा येथील आंबेडकर चौकात वास्तव्य असणाऱ्या मारुती टेंभुर्णी यांच्या जुन्या घराची मोडतोड करीत असलेल्या मजुराच्या अंगावर अचानक भिंत कोसळल्याने तो भिंतीखाली दबला गेला. त्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.
गंभीर जखमी झालेल्या रमेश तुलाविला तात्काळ हात गाडीच्या साह्याने उपस्थित नागरिकांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचाराकरिता जिल्हा सल्ला देण्यात आला.
अंगावर भिंत पडल्याने रमेश चा डावा पाय हात व डोक्याला जबर जखम झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे पाठविण्यात आल्याची माहिती आहे.
मुलाचा अपघात झाला हे समजतात रुग्णालयाकडे धाव घेत आलेल्या त्याच्या आईची ही प्रकृती अचानक बिघडल्याने तिलाही येथील उपजला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तिच्यावर येथे उपचार सुरू असल्याची माहिती आहे.