महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचा गडचिरोली जिल्हा दौरा
1 min readगडचिरोली,(जि एन एन )दि.10: महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग यांचे गुरुवार, दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे येणार आहे. दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे सभागृह येथे कुलगुरु, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, उपकुलसचिव (आरक्षण कक्ष), गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, विभागीय सहायक आयुक्त (मागासवर्ग कक्ष), नागपूर व सहसंचालक उच्च शिक्षण विभाग, विभागीय कार्यालय, गडचिरोली यांच्यासमवेत “अकृषी विद्यापीठ व अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील दि.01.10.2017 अखेरच्या विद्यार्थी संख्या ग्राहय धरुन मंजूर शिक्षण पदभरतीचा आढावा” या विषयावर बैठक घेणार आहेत.