आगीपासून वनाचे संरक्षण करण्यासाठी वनविभाग सज्ज, प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
1 min read“सिरोंचा वनविभागात मोंहा व तेंदु संकलनासाठी आगी लावण्याचे प्रमाण जास्त आहे अशातच डोंगराळ भागामूळे आग पूर्णपणे नियंत्रणात आणणे कठिण असते त्यामुळे हे वनविभाग आगीकरीता अतिसंवेदनशील क्षेत्र असुन या क्षेत्रात आगी लागण्याचे प्रमाण जास्त आहे.”
गडचिरोली, दि.१० : आगीपासून वनाचे संरक्षण करणेकरीता वनविभागामार्फत दरवर्षी शर्तीचे प्रयत्न चालु असतात. यावर्षी सुध्दा सन 2023 मध्ये सुरु होणाऱ्या 15 फेब्रुवारी ते 15 जुन या कालावधीत अग्नी हंगामाचे अनुषंगाने सिरोंचा वनविभागाचे अधिनिस्त 8 प्रादेशिक वनपरिक्षेत्रातील 106 गावात 125 सभा घेवून लोंकामध्ये आगीपासुन वनाचे संरक्षण करणे बाबत जनजागृती करण्यात येत आहे.
सन 2023 मध्ये अग्नी हंगामात आगीवर नियंत्रण आणणेकरीता विभागीय स्तरावर आगी बाबत सभा घेण्यात आलेली आहे. त्याकरीता परिक्षेत्र स्तरावर प्रत्येक कर्मचारी व संगणक ऑपरेटर, अग्नीरक्षक तसेच संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, सेवाभावी संस्था, गावातील प्रतिष्ठीत नागरीक, पोलीस पाटील, गावातील होतकरु नागरीक यांचे फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया या संकेत स्थळावर भ्रमणध्वनी क्रमांकाची नोंदणी करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे परिक्षेत्रातील अधिनिस्त गावांगावात गावकऱ्यांची सभा घेवून आगीबाबत माहिती देवून तसेच शासकीय वाहनांना बॅनर व स्पिकर लावून दंवडी देवून नागरीकांत वनाविषयी जनजागृती करण्याचे कामे वनविभागाचे अधिकारी/कर्मचारी यांचे कडुन करण्यात येत आहे. तसेच गावागावांत आगीपासून वनाचे रक्षण होणे करीता आगीबाबत बॅनर लावण्यात आले. गावात सभेमध्ये मोहाफुले व तेंदु संकलनासाठी आग न लावणे, आग लागल्यास ती विझविण्यासाठी वन कर्मचाऱ्यांना मदत करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच जंगलाला आग लावल्यास भारतीय वनअधिनियम 1927 अन्वये संबधीतावर कायदेशीर कार्यवाहीचे समज देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पेसा ग्रामसभेला तसेच कंत्राटदारांमार्फत तेंदुसाठी वनाला आग लावण्यापासून प्रतिबंधित करण्यासाठी भारतीय वन अधिनियम 1927 नुसार नोटिस देवून ताकीद करण्यात आले व ग्रामसभेमार्फत अग्नीरक्षक नेमण्यासाठी सुचना देण्यात आलेली आहे.
सन 2023 मध्ये अग्नी हंगामात विशेष उपाययोजना म्हणुन विभागीय स्तरावर 1 व परिक्षेत्र स्तरावर 8 आग नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली असुन नियंत्रण कक्षातील नियुक्त कर्मचारी यांचे वैयक्तीक भ्रमणध्वनी क्रमांकाची फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया या संकेत स्थळावर नोंदणी करण्यात आलेली आहे जेणेकरुन वनक्षेत्रात लागलेल्या आगीबाबत अलर्ट त्यांना वेळीच प्राप्त होतील. याबाबतचा संदेश ताबडतोब परिक्षेत्र स्तरावर देवुन आगीवर नियंत्रण आणणेसाठी मदत होईल. आगीवर नियंत्रण
ठेवणे करीता या विभागाकडुन परिक्षेत्र स्तरावर 170 फायर ब्लोअर मशीनचा पुरवठा करण्यात आलेले असुन त्याकरीता लागणाऱ्या इंधनाचा पुरवठा करण्यात आला आहे. तसेच ब्लोअर मशीन हाताळणे बाबत वनकर्मचाऱ्यांना व अग्नी हंगामाकरीता लावण्यात येणाऱ्या अग्नी रक्षकांना व गावातील होतकरु नागरीक यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आगीवर नियंत्रण ठेवणे करीता जंगलात तसेच उंच ठिकाणी मचानी उभारण्यात आले आहे.
या वनविभागात आगीवर नियंत्रणाकरीता अग्नी हंगाम सुरु होण्यापूर्वी परिक्षेत्र स्तरावर आगीकरीता अतिसंवेदनशील क्षेत्रात 2737.36 कि.मी. जाळ रेषा कापणे व जाळण्याचे कामे सुरु आहे तसेच परिक्षेत्र स्तरावर मोहांच्या झाडांची नोंद घेवुन मोहा वेचणारे लोकांची यादी तयार करण्यात आली व मोहांच्या झाडाच्या सभोवताल असलेला पालापाचोळा साफ करुन मोहा संकलनासाठी गावकऱ्यांना जाळी वाटप करण्यात येत आहे.
सन 2023 या वर्षात आगीवर नियंत्रण आणणे करीता विविध माध्यमातुन वरील प्रमाणे वनविभागामार्फत उपाययोजना राबविण्यात येत आहे. यावर्षी कमीत कमी सिरोंचा वनविभागात अंगार लागतील तसेच गावक-यांचे सहकार्य मिळविण्यासाठी वनविभाग प्रयत्नशील राहील.