कूरखेडा उपजिल्हा रूग्णालयात ‘जागरूक “पालक” सूदृढ “बालक” अभियानाची सूरूवात’

कूरखेडा, (जी एन एन): (प्रतिनिधी) १० फेब्रुवारी;राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने पुढील पीढीचे आरोग्या सूदृढ व्हावे याकरीता ‘जागरूक “पालक” सूदृढ “बालक” ही महत्त्वाकांक्षी अभियान सुरू केले आहे . राज्याचे मूख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सादर योजना राज्यभर अमलात आणली जात आहे.
या अंतर्गत उपजिल्हा रूग्णालय कूरखेडा येथे गूरूवार रोजी आरोग्य मेळाव्याचे आयोजन करीत अभियानाचा शूभारंभ करण्यात आला.
अभियानाचे उदघाटन नगराध्याक्ष अनिता बोरकर यांचा हस्ते करण्यात आले याप्रसंगी अध्यक्ष स्थानी उपजिल्हा रूग्नालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ अमीत ठमके होते तर प्रमूख अतिथी म्हणून उपजिल्हा रूग्नालयाचे रूग्न कल्याण समिति सदस्य विवेक निरंकारी रूग्न कल्याण समिति सदस्य सिराज पठान तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनिष रामटेके आदि उपस्थित होते यावेळी उपस्थीतानी मार्गदर्शन करताना अभियानाची रूपरेषा स्पष्ट करण्यात आली. आरोग्य विभागाचा वतीने सलग दोन महिने हा अभियान राबविण्यात येणार असून ग्रामीण दूर्गम भागापर्यंत आरोग्य अधिकारी कर्मचारी पोहचत बालकांची आरोग्य तपासणी औषधोपचार तसेच आवश्यक असल्यास उपचाराकरीता बालकाना तज्ञ वैद्यकीय अधिकारी कडून तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहे. यावेळी पालकांची सूद्धा भेट घेण्यात येत त्याना निरोगी सूदृढ बालकाकरीता प्रबोधन करीत औषधोपचाराची माहीती देण्यात येणार आहे. यावेळी मेळाव्यात उपस्थीत बालकांची तसेच गर्भवती महिलांची तज्ञ वैद्यकीय अधिकारी कडून तपासणी व औषधोपचार करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक वैद्यकीय अधिकारी डॉ संभाजी ठाकर तर संचालन व आभार प्रदर्शन वैद्यकीय अधिकारी डॉ जगदीश बोरकर यानी केले. मेळाव्यात तज्ञ वैद्यकीय अधिकारी भिषक डॉ सचिन कवाडकर , स्त्री रोग तज्ञ स्मीता उके,दंतरोग तज्ञ डॉ वंदना पेद्दीवार , दंतरोग तज्ञ डॉ नितीन जनबंधू यानी सेवा दिली तर डॉ. सूजीत मेश्राम, डॉ अर्चणा गर्हाटे, सचिन कोटागंले , परिसेवीका पुष्पलता खवड, मॅरी विल्सन, धम्मज्योती मेश्राम,शीतल हूद्दार तसेच उपजिल्हा रूग्नालयाचे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यानी सहकार्य केले.