रात्री १ वाजता जंगलात सापळा! ३० जुगारींना बेड्या, ७१ लाख रोख व वाहने जप्त
गडचिरोली, 22 April : जिल्ह्यात अवैध जुगार व्यवसायाच्या कंबरडे मोडण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. कुरखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील गेवर्धा जंगल परिसरात चालणाऱ्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि कुरखेडा पोलिसांनी २१ एप्रिल रोजी रात्री धाड टाकली. या कारवाईत मुख्य सूत्रधार एजाज रफिक शेख उर्फ कात्या याच्यासह 30 आरोपींना अटक करण्यात आली असून, एकूण ७१ लाख ८५ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या विश्वसनीय माहितीवरून कुरखेडा येथील एजाज शेख ऊर्फ कात्या हा गेवर्धा जंगलात इसमांना गोळा करून मोठ्या रकमेचा ताशाचा जुगार चालवत असल्याचे समोर आले. सपोनी भगतसिंग दुल्हत आणि कुरखेडा पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रात्री १ वाजेच्या सुमारास जंगलात सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींमध्ये पळापळ सुरू झाली, मात्र पोलिसांनी घेराव घालून ३० जणांना जागेवरच पकडले.
अटक करण्यात आलेले आरोपी :- एजाज रफिक शेख (कुरखेडा)- देव राजेश केशवानी (कुरखेडा)- अल्ताफ गोहरअली शेख (कुरखेडा)- नरेश भीमराव गावतुरे (तिडका, सडक अर्जुनी)- संजय पुरुषोत्तम मेंढे (गोंदिया)- हरीश विदेशी तांडेकर (गोंदिया)- आदिल बशीर शेख (कुरखेडा)- संदीप दुर्योधन भैसारे (बोडधा, देसाईगंज)- अनमोल उमराव निकुरे (कोहमारा, सडक अर्जुनी)- चंद्रशेखर दत्तू राऊत (डोंगरगाव, अर्जुनी मोर.)- मंगेश मारोती हरणे (अर्जुनी मोर.)- बालक मोतीराम राऊत (खजरी डोंगरगाव, सडक अर्जुनी)- प्रीतम रामचंद्र बडोले (पालांदूर, लाखनी)- सागर बबन तूपट (देसाईगंज)- नंदेश्वर भजन कुमरे (खेडेगाव)- मंगेश तुळशीराम पगारे (जुनी वडसा)- मंगेश हरिचंद्र कुथे (जुनी वडसा)- रामकृष्ण काशिनाथ उके (कोहमारा, सडक अर्जुनी)- सफर समशेर शेख (डवा, सडक अर्जुनी)- ओमप्रकाश साधू सेलोकर (पालांदूर, लाखनी)- निखिल सर्जेराव ठाकरे (जावराबोडी, चिमूर)- हिरा परशुरामजी पाखमोडे (तेलीगाठ बोरी, सडक अर्जुनी)- गोपी (कुरखेडा)- मंगेश बहादूर पोटावी (खेडेगाव, कुरखेडा)- नवीन अग्रवाल (डवा, सडक अर्जुनी)- फिरोज शेख (कुरखेडा)- प्रणय पितांबर गायकवाड (बोडदा, देसाईगंज)- जयंत माधव गायकवाड (बोडदा, देसाईगंज)- विजय नाखाडे (बोडदा, देसाईगंज)- गुरव कांबळे (पालांदूर, लाखनी)
जप्त मुद्देमाल : – रोख रक्कम : २,७५,२०० रुपये – वाहने : १३ चारचाकी + ६ दुचाकी – इतर : २३ मोबाइल, ५२ ताशाचे पत्ते
सर्व आरोपींविरुद्ध कुरखेडा पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अरुण फेगडे यांच्यासह सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उत्तम समन्वय साधला.
जिल्ह्यातील अवैध व्यवसायांविरुद्ध पोलिसांची ही ‘वज्रमुठ’ मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
