December 22, 2024

“माजी आमदार #दिपकदादा आत्राम यांनी #सिरोंचा येथील हजरत वली #हैदरशाह बाबा दर्ग्याला चादर चढवून घेतले दर्शन घेतले”

1 min read

‘दर्शन घेतांना #गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख, शांती, समाधान व उत्तम आरोग्य लाभावे अशी बाबांकडे प्रार्थना केली’

सिरोंचा; (जी एन एन) प्रतिनिधी: १० फेब्रुवारी;
नुकतेच बी आर एस मध्ये प्रवेश केलेल्या माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी सिरोंचा येथे भेट देऊन हजरत वली हैदरशाह बाबाचे अविस पदाधिकारी कार्यकर्त्यांसमेवत चादर चाडवून दर्शन घेतले.
गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटचा टोकावार असलेल्या सिरोंचा येथे दरवर्षी हजरत वली हैदरशाह बाबाचा उर्स आयोजित केले जाते. ऊर्सच्या निमित्त येथे कव्वालीचा कार्यक्रम ही आयोजित केला जातो. जिल्ह्यातील सर्व धर्म समभावचे प्रतीक म्हणून या उत्सवकडे पाहिले जाते.
सदर उर्स कार्यक्रमाला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी 51हजार रूपये रोख रक्कम दान करून मदत केले. यावेळी दर्शन घेतांना गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे असे वल्ली हैदर शाह बाबाकडे प्रार्थना केले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अनिताताई आत्राम, निर्मला मडावी, अविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम, नगरपंचायतचे उपाध्यक्ष बबलु पाशा, नगरसेवक इम्तियाज खान, नगरसेवक भवानी गणपूरपु, मारोती गणापूरपू, स्वीकृत नगरसेवक राजू बंदेला, आविसं सिरोंचा शहर अध्यक्ष रवी सुलतान, सरपंच सूरज गावडे, माजी सरपंच विजय कूसनाके, साई मंदा, दुर्गेश लांबाडी, नागराजू इंगली, नागेश दुग्याला, जुलेख शेख, इमरान सह सिरोंचा तालुक्यातील अविसंचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!