“संस्कार पब्लिक स्कूल एटापल्लीच्या विध्यार्थ्यांची नेत्रदीपक कामगिरी”
1 min read“आष्टी येथे होणाऱ्या जिल्हास्तरिय विज्ञान प्रदर्शनी मध्ये तालुक्याचे प्रतिनिधित्व करणतल्याची संधी ह्या बालकांना मिळाली आहे”
एटापल्ली : जीएनएन(प्रतिनिधी) १० फेब्रुवारी; भगवंतराव हायस्कुल एटापल्ली येथे तालुका स्थरिय विज्ञान प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती.
दिनांक 8 व 9 फेब्रुवारी ला तालुक्यातील विविध शाळेच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक या गट विभागातील विध्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. यात उच्च प्राथमिक गटात संस्कार संस्था द्वारा संचालित संस्कार पब्लिक इंग्लिश मिडीयम स्कूल च्या अक्षरा मूडमाडीगेला, समीक्षा मंडल, आदर्श वासेकर, वैभव मेनेवार, सानिध्या सुरजागडे या विध्यार्थ्यांनी बनवून सादर केलेल्या विज्ञान प्रकल्पाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.
मान्यवरांच्या हस्ते शिल्ड व प्रमाणपत्र देवून ह्या विध्यार्थ्यांना सन्मान करण्यात आला आहे. येथून पुढे आष्टी येथे होणाऱ्या जिल्हास्तरिय विज्ञान प्रदर्शनी मध्ये तालुक्याचे प्रतिनिधित्व करणतल्याची संधी ह्या बालकांना मिळाली आहे. त्यांच्या ह्या यशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष विजय संस्कार (सुंकेपाकवार) यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सादर विज्ञान प्रकल्प साकार करण्यासाठी अंशुल मारगोनवार यांनी परिश्रम घेतले.
विज्ञान प्रदर्शनी पाहण्याकरिता पालकवर्ग, परिसरातील विविध शाळेचे विध्यार्थी तसेच गावातील अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रकल्प पाहणी केली व त्यांचे कौतुक करून पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.