December 23, 2024

नवनिर्वाचित शिक्षक आमदार “सुधाकर अडबाले” उद्या कुरखेड्यात.

1 min read

कुरखेडा; जीएनएन; (प्रतिनिधी): १० फेब्रुवारी:
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना गडचिरोलीच्या वतीने उद्या ११ फेब्रुवारी रोजी कुरखेडा येथील किसान मंगल कार्यालय येथे दुपारी १२.३० वाजता नवनिर्वाचित शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांचा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे.
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन योजना संघटनेचे हक्काचे आमदार असून त्यांचा सत्कार व सन्मान सोहळा संघटनेच्या वतीने येथे आयोजित केलेला आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य अध्यक्ष रितेश खांडेकर हे उपस्थित राहणार असून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना राज्य कार्याध्यक्ष आशुतोष चौधरी, राज्य सल्लागार सुनील दुधे, विभागीय अध्यक्ष अनिल वाकडे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ गडचिरोलीचे कार्यवाह अजय लोंढे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना नागपूर विभागचे विभागीय कोषाअध्यक्ष डॉ. ललित शनवारे प्रमुख्याने उपस्थित राहणार आहेत.
सदर सत्कार सोहळ्याला संघटनेच्या सर्व सभासद व पदाधिकाऱ्यांनी आवर्जित उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

About The Author

error: Content is protected !!