“श्री. शंकराव बेझलवार महाविद्यालय, अहेरी येथे क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव संपन्न”
1 min readअहेरी: जीएनएन (प्रतिनिधी);
स्थानिक श्री. शंकराव बेझलवार महाविद्यालय, अहेरी. येथे दि. 07 ते 09 फेब्रुवारी दरम्यान क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
दि. 07 व 08 फेब्रुवारी दरम्यान महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये कबड्डी, व्हॉलीबॉल, क्रिकेट इत्यादी प्रकारचे सामने घेण्यात आले. दि. 09 फेब्रुवारी ला सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या सुप्त कलांचे प्रदर्शन करत विविध लोकनृत्य, नाटके तसेच गीत सादर केले.
शेवटच्या दिवशी समारोपयीय कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नागसेन मेश्राम, उद्घाटक ग्रंथपाल प्रा. डॉ. लाभसेटवर, प्रमुख अतिथी प्रा. डॉ. रवींद्र हजारे, प्रमुख अतिथी शारीरिक शिक्षण संचालक व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. कांबळे मॅडम व विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष राजेश उसेंडी (विद्यार्थी प्रमुख) म्हणून मंचावर उपस्थित होते. या सांस्कृतिक महोत्सवा दरम्यान महाविद्यालयातील समस्त प्राध्यापक वृंद, संपूर्ण शिक्षकेतर कर्मचारी व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.