“महान क्रांतीकारक गुण्डाधुर धुर्वे स्मृती भुमकाल दिनाचे आयोजन”
1 min readभामरागड: जीएनएन (प्रतिनिधी); ११ फेब्रुवारी:
गोटूल भुमी बांडेनगर (ता. भामरागड, जि. गडचिरोली) येथे पारंपारिक इलाका गोटूल समिती भामरागड तथा आदिवासी विद्यार्थी युवा संघटना, भामरागड यांच्यावतीने महान क्रांतीकारक गुण्डाधुर धुर्वे यांच्या पराक्रमाची स्मृती दिवस म्हणून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणुन श्री. विकास कुडमेथे (तलाईगुडा नांदेड), श्री. सुरेश वेलादी (पांढरकवडा, जि. यवतमाळ), श्री. पांडुरंग मेश्राम (अभिनेते रा. यवतमाळ), श्री. रेला रवि मेश्राम (इंद्रवेली, तेलंगाना) आणि कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन अॅड. लालसू नोगोटी (माजी जि.प.सदस्य, गडचिरोली), श्री. सिताराम मडावी (आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त, जिंजगाव) हे उपस्थित होते.
भुमकाल दिन म्हणजे , स्वातंत्र्य पुर्व काळात १०.०२.१९१० रोजी आदिवासी समाजाचे महान क्रांतीकारक गुण्डाधुर धुर्वे यांनी गोंडवाना प्रदेशातील बस्तर क्षेत्रामध्ये आदिवासी समाजाच्या हक्क, अधिकार आणि जल, जंगल, जमीन यासाठी इंग्रजांविरुध्द भुमकाल विद्रोह आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनाव्दारे त्यांनी १४ ते १५ लढायांमध्ये इंग्रजांचा पराभव केला होता. प्रस्थापित ब्रिटीश सत्तेविरुध्द केलेल्या पराक्रमाची स्मृती व प्रेरणा म्हणुन भुमकाल विद्रोह दिवस मोठया उत्साहात पार पडला. श्री. अक्षय मडावी आणि श्री देसु ईष्टाम यांनी सदर कार्यक्रम आयोजन करिता अथक प्रयत्न केले.