“राष्ट्रवादी महिला काँग्रेस विभागीय अध्यक्ष “सौ.शाहीनताई हकीम” यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची आढावा बैठक संपन्न”
1 min read*महिला जनजागर यात्रा संदर्भात चंद्रपूर जिल्ह्याची आढावा बैठक संपन्न*
अहेरी; जीएनएन (प्रतिनिधी); ११ फेब्रुवारी: राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य कडून दिनांक ४ जानेवारी २०२३ ला आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते पुणे येथे हॉटेल सेंट्रल पार्क डेक्कन येथे महिला जनजागर यात्रेची सुरुवात करण्यात होती. ही यात्रा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात जनजागर यात्रा केंद्र सरकारच्या व महाराष्ट्र सरकारच्या महागाई व बेरोजगारीच्या विरोधात ही महिला जनजागर यात्रा काढण्यात येणार आहे.
ही महिला जनजागर यात्रा फरवरी दिनांक 13/02/2023 ते 15/02/2023 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात जनजागर यात्रेचे आगमन होत आहे त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यात जनजागर महिला यात्रा उत्तमरीत्या यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस विभागीय अध्यक्ष सौ शाहीन ताई हकीम यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत महत्त्वाची आढावा बैठक दिनांक 10/02/2023 ला शासकीय विश्रामगृह चंद्रपूर ला आढावा बैठक संपन्न झाली.
केंद्र सरकारच्या तुघलकी धोरणामुळे सामान्य माणसाचे जीवन जगणे कठीण झाले असून महागाई चा मार सतत त्रास देत आहे.शिवाय बेरोजगार तरुण व तरुणींची संख्या लाखो च्या घरात वाढत आहे त्यामुळे केंद्र सरकार विरोधात आवाज उठविणे अत्यन्त गरजेचे आहे त्यामुळे सर्व महिलांनी मिळून महिला जनजागर यात्रा यशस्वी करावी असे प्रतिपादन शाहीन ताई हकीम यांनी आढावा बैठकीत केले.
सदर बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड युवकचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर ज्विधानसभा अध्यक्ष सुनील काळे ज्येष्ठ नेते ड के अरीकर,महिला अध्यक्ष शालीनी महकुळकर कार्याध्यक्ष चारुशिला बरसागडे, विनोद लाभाणे, युवक शहराध्यक्ष अभिनव देशपांडे, उपाध्यक्ष कुमार पाल ,निसार शेख, नम्रता रायपुरे, मिनू जामगडे, हेमलता बिस्वास, रेखा जाधव आधी कार्यकर्ताची उपस्थिती होती.