“मध्य रात्री घराला लागले आगीत 20 वर्षीय युवतीचा होरपळून मृत्यू”
1 min read“एक लाखापेक्षा जास्त धान्यसह संपूर्ण घर जळाल्याने मोठे नुकसान”
कोरची : तालुका मुख्यालया पासून 30 अंतरावर कोटगुल पोलीस मदत केंद्रच्या हद्दीतील अरमुरकसा येथे 6 फेब्रुवारी ला मध्य रात्री साखर झोपेत असताना घराला अचानक लागलेल्या आगीत वीस वर्षीय युवतीसह संपूर्ण घर जळून नष्ट झाल्याची घटना घडली असून या आगीत सिंधू टेभुरणे 20 असे जळून ठार झाली असे नाव असून कोरची पोलीस स्टेशन मध्ये मर्ग दाखल करण्यात आले आहे.
विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मातृ पितृ हरपलेल्या कुटुंबातीत विनोद टेंभुर्णे, विकास टेंभुर्णे दोन भाऊ बहिण सिंधु टेंभुर्णे आणि रानू विनोद टेंभुर्णै यांच्या कुटुंब दोन्ही भाऊ कंत्राटदाराकडे बांबू काढण्यासाठी मुक्कामाने बाहेरगावी गेले होते एकाच भावाचं लग्न झालं असून तीच्या सोबत घरी वहीनी रानू टेंभुर्णे एक दिड वर्षाच बाळ असताना कु.सिंधु टेंभुणेॅ रा.अरमुरकसा वय २०वर्षे ही आपल्या वहिणी सोबत घरी वेगवेगळ्या रुम मध्ये झोपुन होते मध्य रात्री एक ते दोन च्या जवळपास घराला आग लागली मृत्यू सिंधु ची वहीनी व बाळ घरा बाहेर सुखरुप निघाले पण आगीचे तांडव सुरू असताना सिंधु ऐवडी गाड साखर झोपे कशी काय होती सिंधू आणि तिची वहिनी वेगवेगळ्या खोलीमध्ये झोपले असताना आतून कडी लावली असली तरी ती बाहेर निघू शकली असती मग सिंधू घराबाहेर का पडली नाही तिच्या समोरील दादाची कडी कुणी बाहेरून लावली तर नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे.
घर जळत असताना संपूर्ण घर जळून खाक झाले घरातील संपूर्ण साहित्य जोडून खात झाले त्यात खरीप हंगामातील एक लाखाच्या जवळ्पास असलेले धान्य जळून खाक झाल्याची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे टेंभुर्णी कुटुंबियाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले असून आगीचे नेमके कारण काय हे शोधून काढण्यासाठी गुरुकुल पोलिसांना मात्र सर्कस करावी लागणार आहे
सिंधु जळालीची माहिती वहीनी गावातील लोकांना घर जळाल्याची माहिती दिली.त्या गावकरी लोक धावुन गेले .त्या जळून खाक झाली होती .पण 80 पोते धान्य जळाले
सिंधु टेंभुर्णे ही धान्या ढिगार्यात दबुन कसी होता अशी उलटसुलट चर्चा सुरू आहे सिंधु ला ग्रामीण रुग्णालयांमध्ये कोरची येथें पोस्टमार्टमसाठी करण्यासाठी आण्यात आले होते.पोस्टमार्टम करून त्यांच्या नातेवाईकांकडे प्रेत देण्यात आले असून घटनेचा अधिक तपास कोडगुल पोलीस मदत केंद्रच्या पोलीस उपनिरीक्षक आनंद जाधव करीत आहेत.