“आर्थीक अडचणीत सापडलेला अपघात ग्रस्त कूटूंबातील लग्न सोहळा गावकर्यांचा पूढाकाराने संपन्न”
1 min readकूरखेडा; ताहीर शेख, (प्रतिनिधी): घरातील लग्नाचा तयारीत असताना दूचाकीला लाखांदूर जवळ भिषण अपघात होत दूचाकी वरील दोन भाऊ व एक बहीन गंभीर जखमी झाले उपचारा दरम्यान एक भाऊ दगावला तर एका भावावर रूग्नालयात अद्यापही उपचार सूरू आहे अशा आर्थीक व भावनिक संकटात सापडलेल्या कूटूंबातील लग्न कार्य नियोजित वेळेत होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला असताना समाज बांधव व गावकर्यानी पूढाकार घेत ३५ हजाराची लोकवर्गणी गोळा केली व लग्न नियोजीत वेळेतच पार पाडला
याबाबद सविस्तर माहीती अशी की गेवर्धा येथील राशेदा फारूक शेख यांचा लहान मूलीचे लग्न भंडारा येथील एका यूवकाशी दि ९ फेब्रूवारी २०२३ रोजी नियोजित करण्यात आले होते दरम्यान २५ जानेवारी रोजी नियोजित वधूचे दोन भाऊ व एक बहिन लग्नाची पत्रिका वाटप करण्याकरीता दूचाकीने जात असताना लाखांदूर जि भंडारा जवळ दूचाकीचा भिषण अपघात होत तिघेही भावंडे गंभीर जखमी झाले त्याना लगेच ब्रम्हपूरी येथील एका खाजगी रूग्नालयात दाखल करण्यात आले उपचारा दरम्यान कादीर शेख या भावाचा दि २८ जानेवारी रोजी मृत्यु झाला एक भावावर अद्यापही रूग्नालयात उपचार सूरू आहे उपचारा करीता मोठा खर्च आल्याने आर्थीक व भावनिक संकटात सापडलेल्या या कूटूंबाने लग्न कार्य एका वर्षाकरीता स्थगीत करण्याचा निर्णय घेतला होता सदर बाब गेवर्धा येथील रज़ा जामा मस्जिद कमेटीला माहीत होताच त्यानी त्यानी सभा घेत वर वधू दोन्ही पक्षाची समजूत घालत त्याना आर्थिक व भावनिक आधार देत नियोजित वेळेतच लग्न कार्य पार पाडण्याकरीता त्यांचे मन वळविले या कार्याकरीता कमेटीचे अध्यक्ष डॉ. नासीर खान सचिव तथा ग्रामपंचायत सदस्य रोषन सय्यद,खलील शेख,भोला पठान,ताहीर शेख, आनंद बनाईत, गिरीश कांगली, आशिष टेंभुर्ने, अविनाश भन्नारे, बंडूभाऊ दोनाडकर, राजेश दोनाडकर, सुनील किन्नके, व्यंकटी नगील्वार, राजू बारई, राजेंद्र कुमरे, सचिन नखाते, हेमंत सिडाम, वैजनाथ कांबळे, वासुदेव बालबुद्धे, दिलीप कांबळे, भावेश कांबळे यानी पूढाकार घेत ३५ हजाराची लोकवर्गणी गोळा केली या कार्यात फक्त मुस्लीम समाजच नाही तर गेवर्धा व कूरखेडा येथील हिंदू समाजाने सूद्धा मदत करीत सामाजिक सदभावनेचा संदेश दिला व लग्न कार्य नियोजित दिवशीच दि ९ फेब्रूवारी रोजी पार पाडण्यात सहकार्य केले