“डिजिटल शाळेच्या माध्यमाने थेट अमेरिकेतून गडचिरोलीत शिक्षणाचे धडे”
1 min read“ई -विद्यालोका व सृष्टी संस्थेच्या माध्यमाने जिल्ह्यातील ४८५ विद्यार्थी या डिजिटल शाळेत आधुनिक पद्धतीने शिक्षणाचे धडे गिरवत आहेत”
“ग्रामीण भागातील विद्यार्थी आता परंपरागत शिक्षण पद्धती सोबतच विदेशातील तज्ञ मंडळींकडून मार्गदर्शन मिळत आहे”
गडचिरोली; नसीर हाशमी (प्रतिनिधी); १२ फेब्रुवारी:
गेल्या ५ वर्षापासून गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये शहरी भागासारखे आधुनिक डिजिटल शिक्षण देण्याचे उद्देश समोर ठेवून येथील सृष्टी संस्था व ई-विद्यालोका या डिजिटल शाळा प्रकल्प संस्थेने हे उपक्रम जिल्ह्यात सुरू केलेले आहे.
शहरी भागात शिक्षणाला ग्रामीण भागातील जिल्हा परिषद च्या शाळांमध्ये पोचते करण्याचा मोठा पराक्रम या माध्यमाने झाल्याचे बघावयास मिळत आहे. डिजिटल संच इंटरनेट जोडणी बसवून आधुनिक पद्धतीने शिक्षण देण्याचा अभिनव प्रकल्प सुरू आहे. सदर प्रकल्पामुळे येथील विद्यार्थ्यांमध्ये कमालीचे आत्मविश्वास व शिक्षणाप्रती गोळी निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे.
डिजिटल शाळा या संकल्पनेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देशातील व विदेशातील विविध विषयात तज्ञ असलेल्या शिक्षक मंडळींकडून ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. भारतातून नोकरी व व्यावसायाकरिता विदेशात गेलेल्या उच्च शिक्षित युवक – युवती ई – विद्यालोकाच्या डिजिटल शिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रमास जुळून त्यांचे कौशल्य व ज्ञान विद्यार्थ्यांमध्ये रुजवात आहेत. सामाजिक दायित्व हे उद्देश विदेशात व्यवसाय व नोकरी मध्ये बंधनकारक असल्याने येथे नोकरी करणाऱ्या प्रत्येकालाच आठवड्यातून किमान एकदा निस्वार्थ समाज उपयोगी सेवा द्यावी लागते. याच बाबीचा फायदा आपल्या जिल्ह्यातील ग्रामीण भगात शासकीय जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होत आहे.
या नावीन्यपूर्ण शिक्षण पद्धतीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मनात असणारे शिक्षणाप्रतीचे शंकेचे निरासरन होऊन त्यांनाही शहरी भागाप्रमाणे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात मालेवाडा, येंगलखेडा, गोठनगाव, जांभुरखेडा, गुरनोली, गेवर्धा व वडसा तालुक्यात शंकरपुर, कसारी , चोप, बोळधा येथील जिल्हा परिषदचे शासकीय शाळेत सदर अभिनव प्रकल्प मागील ५ वर्षापासून राबविल्या जात आहे.
प्रकल्प समन्वयक उमेश भारती यांनी सदर प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले की सदर प्रकल्प मध्ये जिल्ह्यातील ४८५ विद्यार्थी नोदणी असून आधुनिक पद्धतीने शिक्षण घेत आहेत.
सृष्टी संस्थेचे सर्वेसर्वा केशव गुरनुले यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या शिक्षण पद्धतीला आधुनिकतेची जोड देत थेट विदेशातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे हे विशेष.