“एकलव्य एकल विद्यालय चांदोना येथे बालक पालक मेळावा”
1 min read‘पालकांनी सुसंस्कारित होवून आपल्या बालकांना सुशिक्षित व सुसंस्कारित करावे,आमदार कृष्णा गजबे यांचे प्रतिपादन’
कुरखेडा: (प्रतिनिधी);१२ फेब्रुवारी:पालकांनी स्वतः सुशिक्षित व सुसंस्कारित बनून आपल्या बालकांना सुसंस्कारित करण्यासाठी योग्य संस्कार देण्याचे गरज असल्याचे प्रतिपादन आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी केले ते लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था विदर्भ नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चादोना येथे बालक पालक मेळावा उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच मंजुळाताई मारगाये, सहउद्घाटक माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, प्रमुख मार्गदर्शक रामकृष्ण बनसोड, कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था सदस्य भारत भुजाडे सर,उपसरपंच रेमाजी किरणापुरे, वनवासी कल्याण आश्रम कुरखेडा येथील पंढरी दर्रो, प्रा. विनोद नागपूरकर, तुकाराम मारगाये, राजुजी बावनथडे, दीनाताई रक्षा ग्रामपंचायत सदस्य अंजूताई कसनकर, प्रकाश चौधरी, श्रीराम नैताम, गणराज कसनकर, माणिक कमरो शितलताई मडावी उपस्थित होते. यावेळी रवींद्र गोटेफोडे,भारत भुजाडे सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी बालक पालक मेळावा मध्ये चांदोना गावातील ज्येष्ठ नागरिकांचा व वेशनमुक्त झालेल्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेमध्ये भाग घेतला होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद करगाम यांनी केले तर प्रास्ताविक कुसन नैताम तर आभार राजेंद्र प्रधान यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चांदनो येथील गावकरी मंडळी व शिक्षक शिक्षिका यांनी सहकार्य केले.