“संकल्प फाऊंडेशन चे सदस्य सुमेध रामटेके यांनी केलेल्या रक्तदाना मुळे वाचले अपघातग्रस्त युवकांचे प्राण”
1 min readकुरखेडा: (प्रतिनिधी); १२ फेब्रुवारी:
कुरखेडा येथे अपघात होवून गडचिरोली वरून नागपूरला हल्विलेल्या कोरेगाव येथील निकेश देवदास डोंबळे वय 22 याला रक्तदान करून संकल्प फाऊंडेशनचे सदस्य सुमेध रामटेके यांनी नवीन जीवन देण्याचा काम केला. त्यांच्या या सेवाभाव व सामाजिक वृत्तीचा सर्वत्र कौतुक केलं जात आहे.
कोरेगाव येथील युवक कामानिमित्य कुरखेडा तालुक्यातील पुराडा येथे गेला होता. सायंकाळी काम आटपून कुरखेडा कडे परत येताना त्याचा लेंडारी गावानजीक दुचाकींचा अपघात झाला. सदर अपघाता मध्ये निकेश ला गंभीर दुखापत झाली. त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे संदर्भीत केले होते. जिल्हा रुग्णालय मध्ये तपासणी करून शस्त्रक्रियेसाठी शासकीय महाविध्यालय नागपूर येथे पाठविण्यात आले. नागपूर रुग्णालयातील डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचे सांगितले व अपघातामुळे अधिक प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने रक्त लावणे गरजेचं आहे असे सांगितले. रक्त लागल्यानंतरच शस्त्रक्रिया होईल असे सांगितले. नातेवाईकांनी रक्तदात्यांचा शोध सुरु केला.
सुमेध रामटेके हा येथील संकल्प फाऊंडेशनचा सभासद असून त्याला लोकांच्या मदतीची खूप आवड आहे. नागपूर येथे राहत शिक्षण घेत आहे. गावाकडील युवक अपघात होवून त्याला शस्त्रक्रिया करिता रक्ताची गरज असल्याचे कळताच ताबडतोब शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गाठून रक्तदान केले.
सुमेधने विनाविलंब केलेल्या रक्तदनाने निकेश डोंबळे या युवकावर तातडीने यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सदर शस्त्रक्रिया वेळेवर झाल्याने या युवकांचे प्राण वाचले.
सुमेध खुशाल रामटेके याने केलेल्या कार्याचे डॉ. जगदिश बोरकर ,अतुल अंबादे, लोकेश ठाकरे,मनीष मेश्राम,जितू वट्टी ,राहुल पाटणकर,फलींद्र मांडवे यांनी अभिनंदन केले तसेच परिसरात सर्वत्र या कार्याचे कौतुक होत आहे .