“आल्लापल्ली व अहेरी आविसं कट्टर ग्रुपकडून आयोजित राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन”
1 min readआल्लापल्ली: (प्रतिनिधी) १२ फेब्रुवारी,;
आल्लापल्ली व अहेरी येथील आविस कट्टर ग्रुप कडून आयोजित राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे उदघाटन भारत राष्ट्र समितीचे नेते ,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी माजी आमदार दिपक आत्राम यांनी नृत्य कला व संगीत कार्यक्रमाबद्दल उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या नृत्य स्पर्धेच्या उदघाटनीय समारंभाला अध्यक्ष म्हणून माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार तर प्रमुख पाहुणे म्हणू संजय चरडुके माजी जी. पं. सदस्य,रोजाताई करपेत नागराध्यक्ष नगर पंचायत अहेरी,शैलेश पटवर्धन उप नगराध्यक्ष अहेरी,विजय कुसनाके माजी सरपंच ग्रा. पं. आलापल्ली, सोनालिताई कंकडालवार, चव्हाण साहेब पो. उपनिरीक्षक अहेरी,विलास सिडाम नगरसेवक,दिलीपजी गंजीवार माजी सरपंच ग्रा. पं. आलापल्ली,सुगंधा मडावी माजी सरपंच, रजनीताई गंजीवार सदस्य ग्रा. पं. आलापल्ली उमेश मोहुर्ले उपसरपंच ग्रा. पं. वेलगूर, मिलिंद अलोणे,जुलेख शेख,विनोद कावेरी,प्रवीण रेषे,योगेश दुर्गे,वसंत आलाम आदी मान्यवर उपस्थित होते.