जूनी पेंशन योजना लागू करून घेणे करिता विविध आयुधाचा वापर करणार- शिक्षक आमदार सूधाकर अडबाले
1 min read“महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना गडचिरोली जिल्हा वतीने कूरखेडा येथे आयोजित सत्कार सोहळ्यात सत्कारमूर्ती म्हणून आपले मनोगत व्यक्त केले.”
कूरखेडा: (प्रतिनिधी), १२ फेब्रुवारी;
जूनी पेंशन योजना या एकमूखी मागणीचा मूद्दयावर मी निवडून आलो याची मला जाणीव आहे ही मागणी पूर्णत्वास नेल्याशीवाय मी स्वस्थ बसणार नाही व तूम्हालाही स्वस्थ बसू देणार नाही याकरीता संसदीय लोकशाहीत असलेल्या विविध आयुधाचा वापर करीत सत्ताधाऱ्याना निर्णय घेण्यास बाध्य करणार असे प्रतिपादन नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सूधाकर अडबाले यानी केले.
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटणा जि गडचिरोली यांचा वतीने येथील कीसान सभागृहात शनिवार रोजी नवनिर्वाचित आमदार सूधाकर अडबाले यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी सत्कारमूर्ती म्हणून मार्गदर्शन करताना सूधाकर अडबाले बोलत होते कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटणेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर होते, तर प्रमूख अतिथी म्हणून कूरखेडा नगरपंचायतचा अध्यक्ष अनिता बोरकर होत्या. जुनी पेंशन योजना संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष आशुतोष चौधरी , राज्य सल्लागार सुनिल दूधे , नागपूर विभागीय अध्यक्ष अनिल वाकडे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे कार्यवाह अजय लोंढे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समीतीचे जिल्हाध्यक्ष धनपाल मीसार, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे , जूनी पेंशन संघटणेचे विभागीय कोषाध्यक्ष डॉ ललीत शनवारे, जिल्हाध्यक्ष गूरूदेव नवघडे जिल्हा सचिव बापू मूनघाटे उपाध्यक्ष अंकूश भेलारे , जिल्हा संपर्क प्रमूख गणेश आखाडे , संघटक प्रविण धाडसे महिला संघटिका अल्का कूमरे आदि उपस्थित होते यावेळी पूढे मार्गदर्शन करताना आमदार सूधाकर अडबाले म्हणाले की महाराष्ट्राचा तूलनेत अप्रगत समजण्यात येत असलेले राजस्थान, छत्तीसगड, झारखंड व हिमाचल प्रदेश या राज्य शासनाने जुनी पेंशन योजना लागू केली आहे , तर ही योजणा महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात अडचण असू नये. असा प्रश्न उपस्थित करीत त्यानी विद्यमान सत्ताधार्यावर टिकास्त्र सोडले.
कार्यक्रमात विविध शिक्षक व कर्मचारी संघटनेचा वतीने अडबाले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक गूरूदेव नवघडे, संचालन जितेंद्र साहाळा व दिपाली कन्नाके तर आभार प्रदर्शन डॉ नयना कोरगंटीवार यानी केले. कार्यक्रमात जिल्हयातील विविध तालूक्यातून आलेले जुनी पेंशन योजना संघटना व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी शिक्षक तसेच कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थीत होते.