“मनरेगा अंतर्गत होणाऱ्या विकासकामांची पंचायत पदाधिकाऱ्यांनी अचानक पाहणी केली”
1 min readकुरखेडा; (प्रतिनिधी) ताहीर शेख; १२ फेब्रुवारी;:
गेवर्धा ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांची पंचायत अधिकाऱ्यांनी अचानक पाहणी केली.
कुरखेडा तालुक्यातील मुख्य ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गेवर्धा ग्रामपंचायतीत सध्या मनरेगा अंतर्गत विविध विकासकामे सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये कोल्हापुरी बंधारा, मामा तालाबचे खोलीकरण, बी. क्रमांक 331 गेट, व पाट बांधकाम, बिहार पॅटर्नच्या धर्तीवर वृक्षारोपण, कुरखेडा-वडसा मुख्य रस्त्यावरील झुडपे काढणे आदी कामे करण्यात येत आहेत.
मुख्य रस्त्यावर झुडपांमुळे होणारे अपघात पाहता गेवर्धा ग्रामपंचायतीने गुरनोली चौक ते चिखली चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झुडपे स्वच्छ करण्याचे निर्णय घेतला आहे. त्या मुळे येथे होणारे अपघात टाळता येतील.
सरपंच सौ. शुषमाताई मडावी, ग्रामपंचायत सदस्य रोशन सय्यद यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली, मजुरांना रोजगार मिळाल्याचा आनंद व्यक्त केला, ग्रामपंचायतीच्या सुरू असलेल्या विकास कामांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.